बिग बॉस मराठीच्या घरामधून पहिल्याच आठवड्यात कीर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील बाहेर पडले आहेत. 'राम कृष्ण हरी' म्हणत त्यांनी बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. पुरुषोत्तमदादा एक वेगळा फ्लेवर घेऊन आले. पण आपला खेळ दाखवण्यात ते कुठेतरी कमी पडले. त्यामुळे आठवड्याभरातच त्यांचा प्रवास संपला. 'राम कृष्ण हरी' म्हणत पाणावलेल्या डोळ्यांनी ते घरातून बाहेर पडले.
advertisement
Mira Jagannath : 'इथे कोणीही मान अपमानाची अपेक्षा ठेवू नये' मिरा जगन्नाथची पोस्ट व्हायरल!
घरातून बाहेर पडल्यानंतर पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले, 'बिग बॉस मराठीचा एक वेगळा अनुभव घेऊन आलोय. माझं काही चुकलं असल्याचं मला वाटत नाही. घरामधला वावर कसा करायचा हे समजता समजता बाहेर आलोय. अनुभव थरारक आहे. स्वत:शी ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं हे घर फार महत्त्वाचं आहे.'
बिग बॉस मराठीच्या घरात एखाद्या गोष्टीला प्रतिकार करायला मला जमलं नाही. तरी जिथे नडता आलं तिथे नडलो. यापुढे घरातील इतर सदस्य मित्रांमध्ये मी मला पाहील. 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की 'बिग बॉस मराठी'चा हा सीझन अभिजीत सावंत जिंकू शकतो. तर सूरज चव्हाण या सीझनमधील वीक खेळाडू आहे, असंही पुरुषोत्तमदादा पाटील म्हणाले.
दरम्यान, घरात 16 स्पर्धकांची एण्ट्री झाली होती आता यातील 15 सदस्य उरले आहेत. त्यामुळे या बिग बॉसच्या रेसमध्ये कोण लंबी रेसचा घोडा ठरेल हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.