गौरववर थेट हल्ला
७ डिसेंबर रोजी झालेल्या ग्रँड फिनालेनंतर माध्यमांशी बोलताना झीशान काद्रीने आपले मत अगदी स्पष्टपणे मांडले. झीशान म्हणाला, "मला अजिबात मजा आली नाही. माझ्या हिशोबाने फरहानाच विजेतेपदासाठी पूर्णपणे लायक होती. फरहानाने जिंकायलाच पाहिजे होती. मला टॉप २ मध्ये अमाल आणि फरहाना यांना पाहायचे होते. आता जे टॉप २ आले, त्यातही फरहाना खरी विजेती होती आणि आमच्यासाठी ती आजही विजेतीच आहे," असे त्याने 'टेली मसाला'शी बोलताना सांगितले.
advertisement
फरहानाने घरात धुमाकूळ घातला, गौरवने काय केले?
गौरव खन्नाने शो जिंकण्यासाठी विशेष काही केले नाही, असे स्पष्ट मत झीशानने व्यक्त केले. फरहाना विजेती का असावी, हे स्पष्ट करताना झीशान म्हणाला, "ज्या पद्धतीने फरहानाने घरात धुमाकूळ घातला आणि गोष्टी केल्या, त्या पाहता तीच खरी विजेती. गौरवसारखे लोक, जे खोलीत बंद होते, किंवा प्रणितसारखे लोक, जे मुद्द्याच्या वेळी बोलत नव्हते... त्यांचा तर घरात कोणताही खेळच नव्हता!"
झीशानने अधिक संताप व्यक्त करत म्हटले की, गौरवने 'बिग बॉस १९' मध्ये कौतुक करावे असे काहीही केलेले नाही. "हा सिझन तान्या आणि फरहाना यांच्या नावावरूनच ओळखला जाईल, ज्या पद्धतीने त्यांनी खेळ खेळला आणि झालेल्या अनफेअर एविक्शनमुळे ओळखला जाईल," असे झीशानने ठामपणे सांगितले. दरम्यान, झीशानने त्याचा जवळचा मित्र आणि गायक अमाल मलिक याचे जोरदार कौतुक केले. "अमाल माझा जीव आहे, माझे प्रेम आहे," असे तो म्हणाला. झीशानच्या या स्पष्ट आणि तिखट प्रतिक्रियेमुळे 'बिग बॉस'च्या निर्णयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
