'महाराष्ट्रावर एक अचानकच संकट कोसळलं. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठं नाव आपल्यात नाहीये, ते म्हणजे अजित दादा.', असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला. उत्तर देताना गौतमी म्हणाली की, "मी एकदमच शॉक होते, की हे काय झाले म्हणून... अजून पण मला विश्वास बसत नाहीये. की असं काही दादांच्या बाबतीत घडलंय म्हणून. आज मी दादांना केव्हा भेटले नाहीये. पण न चुकता दादांनी मला तेवढाच सपोर्ट सुद्धा केला आहे. मी एक सांगेल की, दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. दादांचा कलाकारांना सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं होतं आणि दादांनी प्रत्येक कलाकाराला कायम सपोर्ट दिला आहे. जर त्यांच्याकडे कोणतंही काम घेऊन गेलं तर ते काम होण्याची शाश्वती द्यायचे."
advertisement
"नाही आम्ही केव्हा भेटलो, बोललो केव्हाच नाही दादांच्या बाबतीत. पण त्यांनी मला न देखत का होईना, त्यांनी माझ्या बाबतीत दोन शब्द बोलले आहेत. तिथेच दादांनी माझं एक मन जिंकलं आहे. अजित दादा हे व्यक्तिमत्व खरंच खूप छान आहे. आणि मला नाही वाटत त्यांना महाराष्ट्र केव्हा विसरेल. अख्ख्या महाराष्ट्राचे ते लाडके आहेत आणि कायम असणार आहेत. मुख्य म्हणजे ते कायमच एक नंबरला असणार हे नक्की.", गौतमी पाटीलची ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अख्खा महाराष्ट्र अजूनही अजित पवार यांच्या निधनाबद्दल नि:शब्द आहेत.
पुण्यातील मावळमध्ये एका कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच्या डान्सच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी मिश्किल टीप्पणी करत हशा पिकवला होता. अजितदादा म्हणाले होते की, "तुला काय वाईट वाटतंय? ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल. तुला काय त्रास होतोय?" अजित पवार यांनी दिलेली ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली होती. त्यांनी कायमच गौतमी पाटीलच्या डान्सचे कौतुक केले, हे नक्की.
