लहान मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Mohan Najan
Last Updated:
लहान मुलांच्या शॉपिंगचा विचार आला की बहुतेक आई-वडील ऑनलाइन नाहीतर सहज उपलब्ध होईल असा पर्याय निवडतात. परंतु, त्यात दुप्पट पैसे खर्च करावे लागतात.
कल्याण : लहान मुलांच्या शॉपिंगचा विचार आला की बहुतेक आई-वडील ऑनलाइन नाहीतर सहज उपलब्ध होईल असा पर्याय निवडतात. परंतु, त्यात दुप्पट पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे महिन्याभरात जास्तीचे पैसे खर्च करून उपयोग होत नाही. वाढती उंची आणि तब्येत यामुळे घरात लहान बाळ असेल तर अनेकांना त्यांच्या कपडे खरेदीचे टेन्शन येते. तसे न करता स्वस्तात कल्याणमधील मोहने मार्केटमध्ये लहान मुलांच्या कपड्यांच्या मस्त वेगवेगळ्या व्हरायटी असलेले शॉप बघायला मिळते.
इथे तुम्ही 1 हजारात 5 ड्रेस तुमच्या पसंतीचे खरेदी करू शकता. तेही फक्त 150 रुपयांपासून खरेदी करता येतील. डेली वेअरपासून ते पार्टी वेअरपर्यंत रंगीबेरंगी कपडे, ड्रेस, फ्रॉक, जीन्स अशा अनेक फॅशनेबल कपडे आणि विविध पर्यायांमुळे ग्राहकांची गर्दी या ठिकाणी दिसून येते. सहा महिन्यांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुलांचे कपडे आणि वेगवेगळ्या व्हरायटी बघायला मिळतात.
advertisement
या ठिकाणी बघायला मिळतात. डेली घालण्यासाठी लागणारे कॉटन, सिल्क कपडे 150 रुपयांपासून तर ट्रॅडिशनल आणि पार्टी, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व प्रकारचे ड्रेस, फ्रॉक 250 रुपयांपासून मिळतात. सहा महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत या ठिकाणी कपडे बघायला मिळतात.
advertisement
6 महिने ते 10 वर्षांच्या मुलांचे कपडे
दररोज वापरण्यात येणारे कपडे - 100 ते 150 रुपयांपासून
पार्टी वेअर कपडे - 250 रुपयांपासून पुढे
ऑर्डरप्रमाणे हवे असलेले ड्रेस, फ्रॉक, जीन्स, टी-शर्ट आदी कपडे या ठिकाणी दोन दिवसांत उपलब्ध आहे.
वेळ: सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत
ठिकाण: कल्याणच्या मोहने मार्केट, आंबिवली स्टेशनपासून 5 मिनिटांवर
advertisement
घरात लहान बाळ असेल तर स्वस्त आणि मस्त कपडे खरेदी करण्यासाठी हे शॉप नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Feb 04, 2026 5:27 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
लहान मुलांचे कपडे फक्त 150 रुपयांपासून करा खरेदी, कल्याणमधील हे ठिकाण माहितीये का?





