advertisement

गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये नाही मग नेमकं कोणत्या भांड्यात ठेवावं? तुम्हीही करत असाल चूक तर व्हा सावध

Last Updated:

हिंदू धर्मात गंगाजलाला केवळ पाणी नाही, तर अमृताचा दर्जा दिला जातो. गंगाजल घरामध्ये असणे हे सकारात्मकता आणि पवित्रेचे प्रतीक मानले जाते.

News18
News18
Gangajal Facts : हिंदू धर्मात गंगाजलाला केवळ पाणी नाही, तर अमृताचा दर्जा दिला जातो. गंगाजल घरामध्ये असणे हे सकारात्मकता आणि पवित्रेचे प्रतीक मानले जाते. अनेकदा आपण तीर्थयात्रा करून गंगाजल आणतो, परंतु ते कोणत्या पात्रात आणि कुठे ठेवावे, याचे काही विशिष्ट नियम वास्तुशास्त्रात आणि पुराणात सांगण्यात आले आहेत. अयोग्य पद्धतीने गंगाजल ठेवल्यास त्याचा शुभ प्रभाव कमी होऊ शकतो.
गंगाजल साठवण्यासाठीचे महत्त्वाचे नियम
प्लास्टिकच्या बाटलीचा वापर टाळा
आजकल अनेकजण गंगाजल प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये ठेवतात, जे वास्तुशास्त्रानुसार अत्यंत चुकीचे आहे. प्लास्टिक हे अशुद्ध मानले जाते. गंगाजल नेहमी तांबे, पितळ, चांदी किंवा मातीच्या पात्रात ठेवावे. तांब्याचे पात्र यासाठी सर्वात उत्तम मानले जाते, कारण तांब्यामध्ये गंगाजलाची शुद्धता टिकून राहते.
अंधाऱ्या आणि अस्वच्छ जागी ठेवू नका
गंगाजल कधीही स्वयंपाकघर किंवा स्टोअर रूममध्ये ठेवू नका. ते नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघरात ठेवावे. ज्या ठिकाणी गंगाजल ठेवले आहे, तिथे नेहमी स्वच्छता असावी.
advertisement
पवित्रता राखा
ज्या खोलीत गंगाजल ठेवले आहे, तिथे मांस-मदिरा किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नये. तसेच, शौचास जाऊन आल्यावर किंवा अशुद्ध हातांनी गंगाजलाच्या पात्राला स्पर्श करू नये. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेचा नाश होतो.
पात्राचे तोंड नेहमी बंद ठेवा
गंगाजल ज्या पात्रात ठेवले आहे, त्याचे झाकण नेहमी घट्ट बंद असावे. उघड्या पात्रात ठेवल्याने त्यातील पवित्रता कमी होते आणि बाहेरची धूळ किंवा अशुद्धी त्यात मिसळू शकते.
advertisement
काळोखात ठेवू नका
गंगाजल अशा ठिकाणी ठेवा जिथे थोडा प्रकाश असेल. पूर्णपणे काळोखात किंवा कपाटाच्या तळाशी गंगाजल ठेवणे अशुभ मानले जाते. ईशान्य कोपऱ्यात गंगाजल ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.
गंगाजलाचा वापर
घरामध्ये दररोज किंवा प्रत्येक पौर्णिमेला घराच्या कानाकोपऱ्यात गंगाजलाचा शिडकावा करावा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन लक्ष्मीचा वास राहतो. गंगाजल कधीही संपू देऊ नका, ते संपण्यापूर्वीच त्यात थोडे साधे पाणी न मिसळता पुन्हा शुद्ध गंगाजल आणून भरावे.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
गंगाजल प्लास्टिकच्या बाटलीमध्ये नाही मग नेमकं कोणत्या भांड्यात ठेवावं? तुम्हीही करत असाल चूक तर व्हा सावध
Next Article
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement