advertisement

बॉलिवूडचा दबदबा दक्षिण कोरियात! आमिर खानचा 'हा' सुपरहिट चित्रपट दाखवला जातो शाळेत

Last Updated:
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खान प्रसिद्ध आहे. आमिर त्याच्या अभिनयाप्रती कायमच प्रेम आणि आदर बाळगत आला आहे. त्याच्या अभिनयाचे फक्त भारतातच नाही तर, जगभरातही लाखो चाहते आहेत. त्याच्या चित्रपटांमुळेच त्याला प्रसिद्धी मिळाली आहे.
1/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why

2/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why
आमिर खानने त्याच्या फिल्मी करियरमध्ये अनेक सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'रंग दे बसंती', 'तारे जमिन पर', '3 इडियट्स', 'दंगल' आणि 'सितारे जमीन पर' सारख्या चित्रपटांमध्ये आमिर खानने काम केले आहे. त्याच्या ह्या सर्व चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनामध्ये अढळ स्थान निर्माण केले आहे. भारतामध्ये या चित्रपटांना दमदार प्रतिसाद मिळाला होता.
advertisement
3/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why
सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांची आमिरने स्वत: निर्मिती केली आहे. आमिर खानने 2009 साली रिलीज झालेल्या '3 इडियट्स' चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. इंजिनियर विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांनी पाहिलेला हा चित्रपट आहे. इंजिनिअरिंग शिकत असलेल्या तीन मित्रांवर आधारित असलेल्या चित्रपटात पालकांचा दबाव आणि परिस्थितीमुळे मुलांना किती तणावपूर्ण परिस्थितीतून जावं लागतं या मुद्द्यावर भाष्य केलं गेलं आहे.
advertisement
4/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why
भारतामध्ये सुपर डुपर हिट ठरल्यानंतर आता आमिर खानचा '3 इडियट्स' चित्रपट परदेशातल्या विद्यार्थ्यांना दाखवला जात आहे. आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशीचा हा चित्रपट सातासमुद्रापार पोहोचला असून, दक्षिण कोरियातील विद्यार्थ्यांनाही चित्रपट दाखवला जात आहे. दोन्ही देशांमधील संस्कृती वेगळी असली तरी चित्रपटाचा विषय मात्र लक्ष वेधून घेत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये हा चित्रपट विद्यार्थ्यांना खूप काही शिकवून जात असल्याची माहिती आहे.
advertisement
5/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why
न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, कोरियन विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासामुळे वर्गात हा चित्रपट दाखवला जात आहे. एकमेकांबरोबरच्या सततच्या स्पर्धांमुळे मुलांमधील तणाव कमी करण्यासाठी हा चित्रपट वर्गांमध्ये दाखवला जात आहे. खरंतर, हा एकप्रकारे आमिरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा हा क्षण म्हणावा लागेल. राजकुमार हिराणी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटाची निर्मिती विधु चोप्रा यांनी केलेली आहे.
advertisement
6/6
THIS Aamir Khan Superhit Film Was Screened In South Korean Schools, Here's Why
दक्षिण कोरियामध्ये अनेक भारतीय चित्रपट रिलीज झालेले आहेत. त्यांना प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. यापूर्वी सुद्धा किंग खानचा 'माय नेम इज खान' चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. 2022 साली दक्षिण कोरियामध्ये भारतीय चित्रपट पाहण्यासाठी 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल'चं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा अनेक भारतीय चित्रपट तिथल्या नागरिकांना दाखवण्यात आले होते.
advertisement
Ajit Pawar:  अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा खळबळजनक दावा, ''एका व्यक्तीनं विमानातून...''
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवं वळण, प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने मिटकरींचा ख
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का बसला आहे.

  • ष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमान अपघात प्रकरणात नवा दावा केला

  • अमोल मिटकरींनी या प्रकरणाला आता 'घातपाता'चे नवे वळण दिले आहे.

View All
advertisement