Devkhel सीरीजवर आणखी एक स्फोटक आरोप, 'त्या मराठी अभिनेत्यांनी...' ठाकरेंचा आमदार कडाडला
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Devkhel Series Controversy: सुपरस्टार अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांच्या नुकतंच प्रदर्शित झालेल्या 'देवखेळ' या सीरिजमुळे सध्या कोकणात वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
आमदार भास्कर जाधव यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना दिलेल्या निवेदनात संताप व्यक्त केला आहे. ते लिहितात, "कोकणातील शिमगा उत्सवातील संकासूर हे एक पारंपारिक, पौराणिक आणि भक्तीमय लोकनृत्य पात्र आहे. काळया रंगाचा पोशाख, विचित्र मुखवटा आणि हातात वेत घेऊन गोमूसोबत घरोघरी फिरणारा संकासूर हा शिवाचा अवतार मानला जातो आणि गावकऱ्यांना आशीर्वाद देतो, हे आपल्याला माहीतच असेल. कारण आपणसुद्धा कोकणातीलच आहात."
advertisement
भास्कर जाधव यांनी पुढे लिहिलं आहे, "परंतु, झी ५ या मराठी ओटीटीवर ३० जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या 'देवखेळ' नामक वेबसीरिजमध्ये संकासूर खूनी असल्याचे दाखविण्यात आले आहे. या वेबसीरिजचे चित्रीकरण माझ्याच मतदारसंघात गुहागर तालुक्यात सुरू असून सध्या यावरून गुहागरसह संपूर्ण कोकणात प्रचंड संतापाचे वातावरण पसरले आहे."
advertisement
advertisement
advertisement
advertisement








