TRENDING:

सरकारच्या 'लाडकी बहिण' योजनेवर आधारित नवा चित्रपट, दिसणार गौतमी पाटील अन्...

Last Updated:

एखादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या बहुचर्चित 'लाडकी बहिण योजने'चे समाजात विविध प्रकारे पडसाद उमटले. सरकारी योजनेतील 'लाडकी बहीण' चहूबाजूला चर्चेचा विषय ठरली. आता हिच 'लाडकी बहीण' रुपेरी पडद्यावरही झळकणार आहे. 1500 रुपये हप्ता आमच्या संसारात लाखापेक्षा भारी' असे म्हणत 'लाडकी बहीण' हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
News18
News18
advertisement

या चित्रपटात काय पाहायला मिळणार याचे संकेत पोस्टरवर दिलेल्या टॅगलाईनवरून मिळतात. हा चित्रपट फक्त शासकीय योजनेवर भाष्य करणारा आहे की, यात आणखी काही नाट्यमय घडामोडी दडलेल्या आहेत याबाबतही कुतूहल वाटते. या चित्रपटात स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तिच्या जोडीला सुरेखा कुडची, उषा नाडकर्णी, उषा नाईंक, गौतमी पाटील, रुक्मिणी सुतार (सरू आजी), सारिका जाधव, पूनम कापसे, माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, अनिल नगरकर, सुरेश विशावकर्मा, सिद्धेश्वर झाडबुके, गणेश शिंदे, दर्शना जोकरे, मेगा शिंदे हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

advertisement

( नवी कोरी मर्सिडिज घेऊन अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाला पोहोचली मराठी अभिनेत्री, नवऱ्याचं Mumbai Indiansशी खास कनेक्शन )

एखादी सरकारी योजना सर्वसामान्य गृहिणीच्या संसाराला कशा प्रकारे हातभार लावू शकते याचे चित्रण या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 'एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ...' या उक्तीचा अवलंब करीत गोरगरीब महिला एकत्र येतात आणि कशा प्रकारे आपला उत्कर्ष साधतात हा एक महत्त्वपूर्ण पैलू 'लाडकी बहीण'मध्ये आहे. सरकारी कार्यालयांपासून सर्वसामान्यांच्या घरांपर्यंत सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेला एक महत्त्वपूर्ण विषय हसत-खेळत या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा लेक अधिकारी, क्लासेसचा आधार न घेता मिळवलं यश, UPSC परीक्षेत 434 रँक
सर्व पहा

सामाजिक विषयावर विनोदी अंगाने भाष्य करताना विषयातील गांभीर्य कायम राखण्याचे काम 'लाडकी बहीण' चित्रपटात करण्यात आले आहे. मराठीतील नामवंत कलाकारांचा अभिनय रसिकांना अखेरपर्यत खिळवून ठेवणारा ठरणार असून, लावणी क्वीन गौतमी पाटील सिनेमात गवळण सादर करणार आहे. 17 एप्रिल रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
सरकारच्या 'लाडकी बहिण' योजनेवर आधारित नवा चित्रपट, दिसणार गौतमी पाटील अन्...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल