दरम्यान, बिगबॉसनंतर जान्हवी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसते. ती तिच्या आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते. नुकतंच जान्हवीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडिओ पोस्ट करत तिला आलेला अनुभव सांगितला आहे.
advertisement
जान्हवीने तिच्या अकाऊंटवर दोन व्हिडिओ पोस्ट करत तिचा संताप व्यक्त केला आहे. यावेळी तिने महिलांना पुरुषांपेक्षा कमी लेखणाऱ्या आणि त्यांच्या ड्रायव्हिंग स्किल्सची खिल्ली उडवणाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जान्हवी काय म्हणाली पाहुया.
जान्हवीने दोन व्हिडिओ पोस्ट करत तिचं म्हणणं मांडलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती काय म्हणाली पाहा.
महिलांच्या गाडी चालवण्याच्या क्षमतेला नेहमीच दुय्यम लेखलं गेलं आहे. जान्हवीलाही त्याचा वैयक्तिक अनुभव आला, त्यानंतर तिने तिचा रोष सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. बिगबॉसच्या घरातही जान्हवी तिची मतं कोणत्याही भीतीशिवाय बिनधास्त मांडायची. खेळताना मुलगा-मुलगी असा भेद केलेला तिला तेव्हाही आवडत नव्हता. अशातच तिच्यासोबत ही घटना घडल्यानंतर तिचा संताप झाला आहे.