सुनीता कॅमेऱ्यासमोर म्हणते, "सबने पैसा कमाया, अब मेरी बारी है. अब मैं कमाऊंगी." आणि लगेच तिचे सोन्याचे दागिने दाखवते. पण या व्लॉगची खरी चर्चा झाली ती कारण पहिल्याच भागात सुनीता गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य करते. ती म्हणते, “हे वर्ष माझ्यासाठी खूप कठीण गेले. लोकांनी माझ्याबद्दल खूप बकवास पसरवली.”
'त्या कुटुंबाने माझ्याभोवती गर्दी करुन...' जया बच्चन प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
advertisement
टीझरमध्ये ती चंदीगडमधील महाकाली मंदिर, कालभैरव बाबा मंदिर यांना भेट देते. खास बाब म्हणजे कालभैरव मंदिरासाठी ती दारूच्या बाटल्या विकत घेते. ती स्पष्ट सांगते, “या माझ्यासाठी नाहीत, देवाला अर्पण करण्यासाठी आहेत. लोक समजतील मीच पिते, पण तसं नाही.” पुजारी सांगतात की बाबा दारू पिऊन दुष्टांचा नाश करतात, म्हणून हे अर्पण केले जाते.
टीझर पाहताच नेटकरी दोन गटात विभागले काहींनी तिला फराह खान आणि तिचा स्वयंपाकी दिलीपची कॉपी केल्याचा आरोप केला, तर काहींनी तिचं कौतुक केलं. एकाने लिहिलं, “ओएमजी! सुनीता मॅडम, तुमचा चॅनल सबस्क्राइब केलाय, खूप मजा येणार.” सुनीताचा हा व्लॉग लवकरच यूट्यूबवर येणार आहे आणि पहिल्याच व्हिडिओत तिने वैयक्तिक आयुष्य, प्रवास, धार्मिक स्थळं आणि थोडं ह्यूमर सगळं मिसळून दिलं आहे.