TRENDING:

'जिप्सी' फेम चिमुकल्याची कमाल, 47 डिग्रीत 12 दिवस अनवाणी पायांनी केलं शूटिंग, कबीरचं होणार खास कौतुक

Last Updated:

तब्बल 47 डिग्रीत सलग 12 दिवस अनवाणी करून या चिमुकल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. आज त्याच्या कामाची पोचपावती त्याला मिळाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मराठी टेलिव्हिजन तसंच सिनेमात एकाहून एक टॅलेंडेट बालकलाकार आहेत. त्यांची एनर्जी मॅच करणं अनेकांसाठी टास्क असतो. अशातच एका बालकलाकाराचं खास कौतुक होत आहे. त्याने वयाच्या 7व्या वर्षी सिनेमासाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक होत आहे. तब्बल 47 डिग्रीत सलग 12 दिवस अनवाणी करून या चिमुकल्यानं सगळ्यांचं लक्ष वेधलं. आज त्याच्या कामाची पोचपावती त्याला मिळाली आहे. त्याला 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.
News18
News18
advertisement

61व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक आणि बालकलाकार विभागातील पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्यात उत्कृष्ट बालकलाकार म्हणून कबीर खंदारे (जिप्सी) व त्रिशा ठोसर (नाळ २) यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जिप्सी सिनेमातील बालकलाकार कबीर खंदारे याच्याविषयी काही इंट्रेस्टिंग माहिती पाहूयात.

( 61वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार : 'नाळ'मधील चिमी ठरली उत्कृष्ट बालकलाकार, प्राथमिक नॉमिनेशन यादी समोर )

advertisement

कबीर खंदारे याने जिप्सी या सिनेमात एका डोंबाऱ्याच्या लहान मुलाची भूमिका साकारली होती. या भुमिकेसाठी त्याचं खूप कौतुक झालं होतं. सात वर्षांच्या कबीरने शूटिंगच्या वेळी सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.

जिप्सी या सिनेमाचं शूटिंग सोलापूरमध्ये सुरू होतं. तिथे 42 डिग्री तापमान होतं. कबीरच्या भुमिकेला सुरुवातीचे काही सीन पायात चप्पल नव्हती. त्याने जवळपास 12 दिवस अनवाणी पायांनी शूट केलं होतं. अनवाणी पायाने त्याने जंगल, माळरान, डांबरी रोड फिरत होतं. या सगळ्यात त्याने चेहऱ्यावर जराही वेदना दाखवल्या नव्हत्या. जिप्सीच्या दिग्दर्शकांनी एका मुलाखतीत हे सांगितलं होतं.

advertisement

त्यांनी पुढे सांगितलं की, कोकणात सलग आठ दिवस शूटिंग होतं तेव्हाने त्याने पावसात भिजत सीन्स दिले होते. सतत पावसात भिजल्याने तो आजारी पडला. पण ते सीन्स सिनेमातील महत्त्वाचे भाग होते. त्यामुळे शूटिंग थांबवणं शक्य नव्हतं. पटाहे चार वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत तो आमच्यासोबत पावसात शूट करत होता. प्रत्येक सीन त्याला औषध देऊन केला होता. सीन झाल्यानंतर त्याला उबार येण्यासाठी जनसेटच्या मागे उभं करायचो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
इंजिनिअर सुद्धा फेल, बनवला असा टेबल की 12 प्रकारे येईल वापरता! वर्षाला 50 लाखांचा बिझनेस!
सर्व पहा

कबीर याने बालवयातच अनेक शॉट फिल्म, जाहिराती, डॉक्युमेंट्रीमध्ये काम केलं आहे. त्याना चार वेळा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट म्हणून गोरवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'जिप्सी' फेम चिमुकल्याची कमाल, 47 डिग्रीत 12 दिवस अनवाणी पायांनी केलं शूटिंग, कबीरचं होणार खास कौतुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल