जॅकी श्रॉफ, ज्यांना त्यांच्या चाहत्यांनी ‘सेक्सी श्रॉफ’ या नावाने ओळखायला सुरुवात केली, ते प्रत्यक्षात मात्र खूपच संकोची आणि लाजाळू स्वभावाचे होते. त्यांनी एका जुन्या मुलाखतीत सांगितलं होतं की, माधुरी दीक्षितसारख्या ग्लॅमरस अभिनेत्रीला किस करणं त्यांच्यासाठी खूपच अवघड होतं. ‘वरदी’ चित्रपटातला तो सीन करताना त्यांना अक्षरशः घाम फुटला होता. अगदी जुही चावलासोबत ‘आयना’मध्येही त्यांना तसंच वाटलं. हे सांगताना ते खुद्कन हसले, पण प्रत्यक्ष त्यावेळी मात्र त्यांना प्रचंड दडपण आलं होतं.
advertisement
TV चा शाहरुख खान, एका एपिसोडसाठी घ्यायचा 1.5 लाख, आता काम मिळणंही मुश्किल, 6 वर्षांपासून बेरोजगार
नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये तर त्यांनी आणखी एक किस्सा उघड केला. तो किस्सा जो ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले. एका चित्रपटासाठी निर्मात्यांनी त्यांना त्यांचं शरीर वॅक्स करायला सांगितलं होतं, म्हणजेच त्यांना त्यांच्या शरीरावरील सर्व केस काढायचे होते कारण त्या भूमिकेसाठी त्यांना बिकिनी परिधान करावी लागणार होती. “मी कधीच वॅक्सिंग केलं नव्हतं. शेवटी मी तो चित्रपटच नाकारला!” असं त्यांनी हसत हसत सांगितलं.
जॅकी श्रॉफ यांची कारकीर्द केवळ रोमँटिक किंवा इंटिमेट सीनपुरती मर्यादित राहिली नाही. त्यांनी ‘त्रिदेव’, ‘कर्मा’, ‘राम लखन’, ‘देवदास’सारख्या चित्रपटांतून ताकदीच्या भूमिका केल्या. ‘रंगीला’मधल्या ‘राजा’ने लोकांना वेड लावलं. त्यांनी ‘फोन भूत’मध्ये एकदम हटके भूमिका साकारून ओटीटीच्या प्रेक्षकांनाही आपलंसं केलं.
‘क्रिमिनल जस्टिस’सारख्या गंभीर वेब सिरीजमध्ये विक्रांत मेस्सीसोबत जॅकीची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. ‘सूर्यवंशी’मध्ये तर त्यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची दाद मिळवली. वयाने ज्येष्ठ असूनही त्यांनी आपल्या अभिनयातून आणि व्यक्तिमत्त्वातून आजच्या पिढीलाही भुरळ घातली. ज्या अभिनेत्याला बाहेरून ‘डॅशिंग’ आणि ‘सेक्सी’ म्हटलं जातं, त्याचं अंतर्मन इतकं सोज्वळ, लाजाळू असू शकतं, हे जॅकी श्रॉफ यांच्याकडून शिकण्यासारखं आहे.