TV चा शाहरुख खान, एका एपिसोडसाठी घ्यायचा 1.5 लाख, आता काम मिळणंही मुश्किल, 6 वर्षांपासून बेरोजगार
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Indian Television Actor : एकता कपूरच्या स्टारला गेल्या 6 वर्षांत कोणतंही काम मिळालेलं नाही. अभिनेत्याने बॉलिवूड निर्मात्यांवर टीका केली.
advertisement
advertisement
हा अभिनेता दुसरा कोणी नसून 'ये है मोहब्बतें'चा स्टार करण पटेल आहे. करण पटेलने भारती सिंहच्या पॉडकास्टमध्ये आपल्या करिअरबद्दल सांगितले की, 'गेल्या 6 वर्षांत मला एकही डेली सोपची ऑफर आलेली नाही. आज रोज 150 ते 200 अभिनेते येतात, जे कमी पैशात काम करायला तयार आहेत. एक काळ होता जेव्हा टेलिव्हिजनमध्ये भरपूर पैसा होता.'
advertisement
advertisement
advertisement
यावेळी करणने बॉलिवूड निर्मात्यांवरही टीका केली. त्याने सांगितले की, जर एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीत यशस्वी झाली तर सगळे त्याचे अनुकरण करायला लागतात. 'कबीर सिंह' नंतर महिलांना कमी लेखण्याचे ट्रेंड सुरू झाले. तसेच 'एनिमल'च्या बाबतीतही तसेच झाले. 'फॅमिली मॅन'नंतर सगळे तसेच कंटेंट बनवायला लागले. करण त्या काळात इतका लोकप्रिय होता की लोक त्याला टेलिव्हिजनचा शाहरुख खान म्हणायचे.
advertisement
advertisement