अक्षयाची लग्नानंतरची पहिली मंगळागौर मोठ्या धुमधडक्यात साजरी केली. दोन्ही कुटुंब यानिमित्तानं एकत्र आली. अक्षया तर मंगळागौरीसाठी नवरीप्रमाणे सजली होती. मंगळागौरीच्या पूजेसाठी अक्षयानं गोल्डन रंगाची बनासरी सिल्क साडी नेसली होती. सुंदर दागिने आणि हेअर स्टाइलनं तिनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर मंगळागौरीचे खेळ खेळण्यासाठी अक्षयानं खास महाराष्ट्रीय नऊवारी साडी नेसली. नऊवारी साडीत अक्षया दणकून मंगळागौरीचे खेळ खेळली. तिच्याबरोबर हार्दीकनं देखील प्रत्येक खेळात फेर धरलेला पाहायला मिळालं.
advertisement
बायकोच्या मंगळागौरीमध्ये हार्दीक मोठ्या उत्साहात सामील झाला होता. दोघांनी एकत्र पूजा केली आणि त्यानंतर खेळांमध्येही सहभाग घेतला. अट्टूश पान, लाट्या बाई लाट्या, सुप उडवणे, फेर धरणे, फुगड्या घालणे असे मंगळागौरीचे सगळे पारंपरीक खेळ अक्षया खेळले. अक्षयाला साथ देण्यासाठी हार्दीक देखील लाटणं आणि सुपली हातात घेतली आणि मोठ्या उत्साहात खेळ खेळताना दिसला. दोघांच्या मंगळागौरीच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळतोय.
अक्षयानं हार्दीकसाठी खास उखाणा देखील घेतला. पावसाळा संपत आला येईल आता हिवाळा हार्दीक रावाचं नाव घेतं मंगळागौरीच्या कार्यक्रमाला, असा सुंदर उखाणा अक्षयानं घेतला. लग्नानंतर अभिनेता हार्दीक जोशीनं कामाला सुरूवात केली आहे. सध्या तो तुझेच मी गीत गात आहे मालिकेत काम करतोय. हार्दीक आणि अक्षया दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. एकमेकांवरील प्रेम ते व्यक्त करताना दिसतात.