‘दिल-ए-नादान’ या नव्या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिस, नर्गिस फाखरी आणि सोनम बाजवा यांसारख्या ग्लॅमरस ताऱ्यांची झलक पाहायला मिळते.
अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसणार बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री
संगीत, लोकेशन्स आणि कोरिओग्राफीसह गाणं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतंय. पण... या गाण्याचे शेवटचे काही सेकंद खूपच खास आहेत. कारण, त्या काही सेकंदांमध्ये अक्षय कुमारसोबत एक नवीन चेहरा झळकतो आणि ती दुसरी तिसरी कोणी नसून, ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातील ‘परदेसी गर्ल’ इरिना रुडाकोवा आहे! इरिना बिग बॉसच्या घरात तिच्या मराठमोळ्या प्रेमाने आणि मनमोकळ्या स्वभावाने घराघरात पोहोचली होती.
advertisement
मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली अभिनेत्रीची आई, वैतागलेल्या लेकीने करून दिला पालकांचा घटस्फोट
मूळची रशियन असलेली इरिना भारतात येऊन मराठी संस्कृतीत एकरूप झाली. इरिनानं याआधी हिंदी मालिका आणि IPL मध्ये चीअरलीडर म्हणूनही काम केलं होतं. पण आता ती थेट अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल ५’च्या गाण्यात झळकली आहे हे तिच्या करिअरसाठी एक मोठं वळण ठरणार आहे.
गाण्याच्या शेवटी अक्षयसोबत तिचा छोटासा, पण लक्षवेधी प्रसंग दिसतो आणि त्यामुळे अनेकांच्या मनात आता एकच प्रश्न उभा राहिला आहे की इरिनाची झलक केवळ गाण्यापुरतीच आहे की सिनेमात तिची भूमिकाही पाहायला मिळेल? सध्या तरी निर्मात्यांकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, पण चाहत्यांनी मात्र इरिनाला ‘हाऊसफुल’ टीममध्ये पाहून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
‘हाऊसफुल ५’ या सिनेमाची अधिकृत रिलीज डेट अजून जाहीर झालेली नाही, पण त्याच्या आजवरच्या गाण्यांनी आणि स्टारकास्टमुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा निश्चितच गगनाला भिडल्या आहेत. आणि या सगळ्यात इरिनाची छोटीशी झलक तिच्या मोठ्या यशाची नांदी ठरेल, यात शंका नाही!