TRENDING:

Dosa Recipe : डोसा तेलात फ्राय करून एकदम नवीन पदार्थ; कुठेच पाहिली नसेल ही रेसिपी

Last Updated:

Dosa Recipe Video : तुम्ही डोसा तेलात फ्राय करून पाहिला आहे का? डोशापासून एकदम नवीन असा हा पदार्थ. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोसाचे बरेच प्रकार आहेत. साधा डोसा, मैसूर डोसा, मसाला डोसा, चीझ डोसा... असे डोशामध्ये वेगवेगळे प्रकार तुम्ही खाल्ले असतील. पण तुम्ही डोसा तेलात फ्राय करून पाहिला आहे का? डोशापासून एकदम नवीन असा हा पदार्थ. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
News18
News18
advertisement

डोसा तेलात फ्राय करून त्यापासून नवीन पदार्थ... वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. असा यापासून काय पदार्थ बनवायचा हे पाहण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. पण त्याआधी डोसा कसा बनवायचा ते पाहुयात, त्यानंतर डोशापासून ही नवीन रेसिपी आपण पाहू.

Black Dosa Recipe Video : नागपुरात मिळतो काळा डोसा, पण बनवतात कसा? सीक्रेट रेसिपी

advertisement

डोशासाठी लागणारे साहित्य

2 कप तांदूळ

1/2 कप उडीद डाळ

1 चमचा मेथी दाणे

चवीनुसार मीठ

तेल

डोसा कसा बनवायचा?

तांदूळ, उडीद डाळ आणि मेथी दाणे वेगवेगळे धुवा. सर्व साहित्य 5–6 तास पाण्यात भिजत ठेवा. भिजल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. हे पीठ एका भांड्यात काढून 8–10 तास आंबवण्यासाठी झाकून ठेवा  सकाळी पीठ फुगलेले दिसेल, त्यात मीठ घाला आणि हलकं ढवळा.

advertisement

Idli Dosa Batter : तुम्हीही एकाच पिठापासून बनवता इडली, डोसा; इथंच चुकताय! साऊथ इंडियनने सांगितले 4 फरक

तवा मध्यम आचेवर गरम करा. तव्यावर थोडं तेल लावा. एक डाव पीठ घालून गोलाकार पसरवा. बाजूने थोडं तेल किंवा तूप सोडा. डोसा कुरकुरीत झाला की दुमडून प्लेटमध्ये काढा.

डोशापासून नवीन पदार्थ

आता हा डोसा तेलात चांगला फ्राय करून घ्या. जसं पापड तळतो तसा डोसा दोन्ही बाजूंनी तळून घ्यायचा आहे. आता यावर  यावर आलू मसाला म्हणजे बटाट्याची तिखट भाजी पसरवून घ्या. यावर कोथिंबिरीची हिरवी चटणी लावा. वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची पसरवून घ्या. वरून मीठ आणि बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बारावीत दोनदा नापास, 7 वर्षे ड्रायव्हिंग, शेतकऱ्याच्या लेकानं ठरवलं, झाला फौजदार
सर्व पहा

@golus_kitchen_by_tanvigor इन्स्टाग्राम अकाऊंटवर डोशापासून बनवलेल्या या पदार्थाचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. अनेकांना डोशासोबत केलेला हा विचित्र एक्सपरिमेंट आवडलेला नाही. तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा पदार्थ ट्राय करून तो कसा लागला आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Dosa Recipe : डोसा तेलात फ्राय करून एकदम नवीन पदार्थ; कुठेच पाहिली नसेल ही रेसिपी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल