TRENDING:

Rekha's Home: समोर समुद्र किनारा अन् बंगल्याजवळ हिरवळ; शाहरुखच्या शेजारी राहते बिग बींसोबत काम केलेली सुपरस्टार अभिनेत्री

Last Updated:

आपल्या आरस्पानी सौंदर्याने अख्ख्या बॉलिवूडला घायाळ करणाऱ्या अभिनेत्रीचं घर नेमकं कुठे आहे?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आपल्या सदाबहार सौंदर्याने चाहत्यांना अभिनेत्री रेखाने घायाळ केले आहे. रेखाची मोठ्या प्रमाणावर फॅन लिस्ट आहे. रेखाचा वयोगटातला चाहता वर्ग आहे. आपली आवडती अभिनेत्री कुठे राहते? हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे. एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा बांद्राच्या एका पॉश परिसरात राहते. तिचं घर सुद्धा तितकेच लॅविश, सुंदर आणि लक्झरियस आहे.
how to reach bollywood actress rekha's house from bandra railway station know A To Z information
how to reach bollywood actress rekha's house from bandra railway station know A To Z information
advertisement

रेखाच्या घराचं नाव 'बसेरा' असं आहे. जे मुंबईच्या पॉश बँडस्टँड परिसरात घर आहे. अभिनेत्रीचं घर शाहरुख खानसह इतर अनेक बड्या सेलिब्रिटींच्या परिसरात आहे. अभिनेत्री रेखा यांचे घर पाहण्याची अनेक चाहत्यांना इच्छा आहे, एक नजर टाकूया अभिनेत्रीच्या घरी जाण्याचा पर्याय. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे स्थानकावर उतरून तुम्ही बॅन्स्टॅन्डला जाऊ शकता. जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल, तर तुम्हाला दादरवरून पश्चिम रेल्वेवर या तिथून पुढे दादरवरून फास्ट किंवा स्लो ट्रेन पकडून वांद्रे स्थानकावर या. रिक्षा अथवा बेस्ट बस पकडून तुम्ही बॅन्स्टॅन्डला जाऊ शकणार आहेत.

advertisement

बांद्रा रेल्वे स्थानकापासून 5 किलोमीटर अंतरावर अभिनेत्री रेखा यांचं 'बसेरा' बंगला आहे. इतक्या अंतरासाठी बस किंवा टॅक्सीने 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. 80 क्रमांकाच्या बेस्ट बसने तुम्ही अभिनेत्रीच्या घराच्या समोर पोहोचता. बांद्रा पश्चिमच्या बस स्टॉपवरून ही बस सुटते, रेखा सदन असं अभिनेत्रीच्या घराच्या जवळील बसस्टॉपचं नाव आहे. तुम्ही तिथे उतरू शकाल. दरम्यान, अभिनेत्री रेखाच्या घरी दररोज हजारो चाहते भेट देतात. अनेकांना अभिनेत्रीला प्रत्यक्षात पाहायला ही मिळतं तर काहींच्या ते सुद्धा नशिबात नसतं. लाखो चाहते अभिनेत्रीच्या घराबाहेर फोटो काढत असतात.

advertisement

रेखाच्या घराविषयी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, तुरीच्या दरात झाली मोठी वाढ, सोयाबीनला काय मिळाला दर?
सर्व पहा

रेखा यांच्या बंगल्याचं नाव 'बसेरा' असून त्याची किंमत 100 कोटी रूपयांच्या आसपास आहे. मुंबईतील सर्वात पॉश एरियामध्ये आणि सर्वात शांत असलेल्या परिसरामध्ये त्यांचं घर आहे. समुद्र किनारी असलेल्या या बंगल्यासमोर सर्वत्र हिरवळ आहे. रेखा यांच्या बंगल्याच्या गेटवर शंकराच्या हाताची प्रतिकृती सुद्धा आहे. त्याच्यावर 'ओम नम: शिवाय' असं देखील लिहिलेलं दिसत आहे. त्यांच्या गेटने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. खरंतर, रेखा यांच्या बंगल्यामध्ये जाण्याची कोणालाही परवानगी नाही. रेखा यांचे मित्रमंडळी आणि त्यांच्याघरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीं इतरत्र कोणालाही त्यांच्या बंगल्यात प्रवेश करण्याची कोणालाही परवानगी नाही.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rekha's Home: समोर समुद्र किनारा अन् बंगल्याजवळ हिरवळ; शाहरुखच्या शेजारी राहते बिग बींसोबत काम केलेली सुपरस्टार अभिनेत्री
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल