ईशान रोशनच्या विवाह सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद देखील दिसत आहे. दिग्दर्शक आणि हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी त्यांचा पुतण्या ईशान आणि ऐश्वर्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. या फोटोंमध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत आहे. हृतिक रोशन, सबा आझाद, राकेश रोशन, त्यांची पत्नी पिंकी रोशन, मुलगी सुनैना रोशन आणि अभिनेत्याचे दोन्ही मुलगे, हृधान आणि हृहान अनेक वर्षांनी मीडिया समोर आलेत.
advertisement
( 'माझी होणारी सून', जया बच्चननी करून दिलेली ओळख, अशी होती करिश्मा कपूरची रिअॅक्शन, VIDEO व्हायरल )
हृतिक रोशनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो समोर आले आहेत ज्यामध्ये तो त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत नाचत आणि धमाल करताना दिसत आहे. अभिनेत्याने त्यांच्या कुटुंबासाठी हा खास दिवस आणखी खास बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही.1999 साली आलेल्या 'इश्क तेरा तडपावे' या गाण्यावर ऋतिकनं डान्स केला. यावेळी त्याला साथ देण्यासाठी त्याची दोन्ही मुलं त्याच्या बाजूला उभी होती. ऋतिकनं त्याने ब्लॅक कलरचा ड्रेस वेअर केला होता. तर ऋहान एथनिक व्हाइट कपड्यांमध्ये दिसला. तर ऋदानने पप्पा ऋतिकसोबत ब्लॅक कपड्यांमध्ये मॅच केलं होतं.
मुलांसोबत डान्स करताना पाहून ऋतिकच्या चाहत्यांना कमेंट करत त्याचं कौतुक केलं आहे. एका युझरनं लिहिलंय, "ऋतिक रोशनच्या मुलांना सगळ्या चांगल्या गोष्टी वारश्यात मिळाल्या आहेत." दुसऱ्या युझरनं लिहिलंय, "रोशन भाई फक्त डान्स करत नाही तर ते स्टेजवर आग लावतात." आणखी एकानं लिहिलंय, "ऋतिकचा डान्स बघणं म्हणजे एक ट्रिट असते."
गायक उदित नारायण आणि त्यांची पत्नी इशान रोशन आणि ऐश्वर्या यांच्या लग्नाला उपस्थित होते. राकेश रोशन त्यांची मुलगी सुनैना रोशनला कार्यक्रमात घेऊन जाताना दिसले. सुनैनाने सोनेरी रंगाचा लेहेंगा घातला होता, तर राकेश रोशनने पांढरी शेरवानी घातली होती.
संपूर्ण कार्यक्रमात ज्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले ती म्हणजे हृतिकची एक्स वाइफ सुझान खान हिनं. सुझान खान तिचा बॉयफ्रेंड अर्स्लान गोनीसोबत तिच्या एक्स नवऱ्याच्या फॅमिली फंक्शनमध्ये आली होती. डिवोर्सनंतरही हृतिक आणि सुझान यांच्यात खूप चांगलं नातं आहे. वेगळे होऊनही ते अनेकदा एकत्र दिसतात. त्यांच्या मुलांसाठी ते कायमच एकत्र असतात.
