'आरपार'च्या प्रमोशनदरम्यान चाहत्याने हृताला केलं प्रपोज
'आरपार'च्या प्रमोशनदरम्यान चाहत्याने हृताला प्रपोज करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हृताचा वेडा चाहता म्हणतोय,"हृता मॅडमचा मी खूप मोठा चाहता आहे. त्यांचे स्क्रीनवर दिसणारे आतापर्यंत एकूण 10 प्रोजेक्ट झाले आहेत. तीन मालिका, दोन वेब सीरिज आणि पाच चित्रपट आणि तुम्ही कालच पोस्ट टाकली की तुमचा 11 वा नवीन प्रोजेक्ट येतोय. माझ्या शरीरावर 10 टॅटू आहेत. मला तुम्हाला विनंती करायची आहे की, तुम्ही मला ऑटोग्राफ द्यावा आणि तो ऑटोग्राफ मी माझा 11 वा टॅटू म्हणून काढेल. मॅडम माझं तुमच्यावर खरचं प्रेम आहे", असं म्हणत चाहत्याने आपल्या हातावर हृताचा टॅटू काढून घेतला आहे.
advertisement
'आरपार' चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान एका सिनेप्रेमीने आपल्या गर्लफ्रेंडला भर सिनेमागृहात प्रपोज केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. 'आरपार' प्रेम कसं करायचं हे सांगणारा हा चित्रपट आहे. कॉलेज तरुणांमध्ये या चित्रपटाची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे.
अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री हृता दुर्गुळे ही जोडी पहिल्यांदाच 'आरपार' या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आली आहे. ललित आणि हृता 'आरपार' या सिनेमातून पहिल्यांदाच रुपेरी पडदा गाजवणार आहेत. रोमँटिक कथा असलेल्या या सिनेमात ललित व हृता यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे. ‘प्रेमात अधलं मधलं काही नसतं', याचे वर्णन दर्शविणारा हा सिनेमा आहे.