'मास्टरशेफ ऑफ इंडिया' च्या 'सेलिब्रेटी मास्टर शेफ' हा शोचा पहिला सीझन खूप गाजला. पहिल्या सीझनमध्ये अभिनेते गौरव खन्नानं बाजी मारली. आता'मास्टरशेफ ऑफ इंडिया' देखील प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. सामान्य घरातील लोकांना आपलं कुकिंग टॅलेंट देशभरासमोर मांडण्याची संधी या शोमधून मिळते. सेलिब्रेटी मास्टर शेफचा दुसरा सीझन 5 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
advertisement
( नवी नवरी कधीची दारात उभी, इकडे राकेश रोशन यांचा तृतीयपंथीयांशी वाद, नेमकं झालं काय? )
या नव्या सीझनमध्ये मराठी इन्फ्लुएन्सर अर्चना धोत्रे हिनं एंट्री घेतली आहे. अर्चना या घरोघरी जाऊन टिफिन आणि जेवण बनवण्याचं काम करते. आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने कुकिंग क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अर्चना यांचं सोशल मीडियावर व्लॉग करतात. घरोघरी जाऊन टिफिन बनवण्याचं काम करतात. प्रत्येकाच्या घरी काय बनवलं हे त्या दाखवतात. कोणताही तामझाम नाही किंवा एडिटिंग नाही. स्वीट अँड सिंपल अशा त्यांच्या व्हिडीओला आतापर्यंत लाखोंची पसंती मिळाली आहे. त्यांचं हेच टॅलेंड आता नॅशनल टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे. तिचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
मास्टर शेफ इंडियाचा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यंदाही या शोमध्ये परिक्षक म्हणून प्रसिद्ध शेफ विकास खन्ना, रणवीर ब्रार आणि कुणाल कपूर दिसणार आहेत. अर्चना यांचा प्रोमो नुकताच रिलीज झाला असून या प्रोमोला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.
यंदाचा 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'चा सीझन अनेक अर्थाने खास असणार आहे. यावेळी स्पर्धकांना एकट्याने नाही तर जोडीने सहभागी व्हायचं आहे. अर्चना यांत्यांच्या पार्टनर रुपाली 'मास्टरशेफ ऑफ इंडिया'मध्ये सहभागी झाली आहे. अर्चनांचं कुकिंग टॅलेंट पाहून परिक्षकही थक्क झालेले दिसतात. कुणाल कपूर यांनी अर्चना यांना तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवता, असा प्रश्न विचारला. त्यावर अर्चनांनी आत्मविश्वासाने इंडियन, चायनीज, स्पॅनिश अशा विविध पदार्थांची यादी सांगितली. विकास खन्नाने अर्चनांचं विशेष कौतुक करत म्हटलं, "जेवणासाठी मी कोणाच्याही डोळ्यांत एवढं प्रेम पाहिलेलं नाही".
