नवी नवरी कधीची दारात उभी, इकडे राकेश रोशन यांचा तृतीयपंथीयांशी वाद, नेमकं झालं काय?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांचं संपूर्ण लग्न खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न झालं पण लग्नानंतर नव्या नवरीच्या गृहप्रवेशावेळी वेगळाच प्रकार घडला. नवीन नवरी दारात गृहप्रवेशासाठी खोळंबलेली असताना दुसरीकडे राकेश रोशन तृतीयपंथीयांची वाद घालताना दिसले.
बॉलिवूड सुपरस्टार ऋतिक रोशनच्या घरी अनेक वर्षांनी लग्नाचं वातावरण पाहायला मिळालं. ऋतिक रोशनचा काका प्रसिद्ध संगीतकार राजेश रोशन यांचा मुलगा ईशान रोशन याचं 23 डिसेंबर रोजी लग्न झालं. ऐश्वर्या सिंह हिच्यासोबत तो विवाहबंधनात अडकला. या लग्नसोहळ्याला रोशन कुटुंबातील अनेक सदस्य उपस्थित होते. ऋतिक रोशन आपल्या दोन्ही मुलांसह आणि गर्लफ्रेंड सबा आझादसोबत लग्नात सहभागी झाला होता. ऋतिकचे वडील राकेश रोशन यांनीही या समारंभाला उपस्थिती लावली. संपूर्ण लग्न खूप चांगल्या पद्धतीनं संपन्न झालं पण लग्नानंतर नव्या नवरीच्या गृहप्रवेशावेळी वेगळाच प्रकार घडला. नवीन नवरी दारात गृहप्रवेशासाठी खोळंबलेली असताना दुसरीकडे राकेश रोशन तृतीयपंथीयांची वाद घालताना दिसले. लग्नाच्या शेवटी नेमकं काय घडलं?
रोशन कुटुंबातील हे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. ईशान रोशन आणि ऐश्वर्या सिंह यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र याच लग्नातील एक व्हिडीओ सध्या सर्वाधिक चर्चेत आला असून त्यात राकेश रोशन आणि तृतीयपंथीयांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे.
advertisement
लग्नानंतर नव्या नवरा-नवरी आशीर्वाद देण्यासाठी तृतीयपंथी येतात. त्यांना शगुन म्हणून पैसे दिले जातात. ईशानच्या लग्नात तृतीयपंथीयांनी हजेरी लावली होती. त्यांनी दारात उभ्या असलेल्या नवी नवरी ऐश्वर्या आणि नवरा ईशान यांना थांबवलं होतं. त्यानंतर राकेश रोशन तिथे आले आणि तृतीयपंथीयांशी बोलत होते. मात्र ही चर्चा काही वेळातच वादात रूपांतरित झाली.
सूत्रांच्या माहितीनुसार, रोशन कुटुंबाकडून शगुन देण्यात आला होता. पण तृतीयपंथीय शगुनाच्या रकमेवर समाधानी नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांनी आणखी शगुनाची मागणी केली आणि त्यावर राकेश रोशन भडकले असं म्हटलं जात आहे. राकेश रोशन यांच्या बॉडीलँग्नेजमधूनही ते संतापल्याचं दिसत आहे.
advertisement
advertisement
दरम्यान वाद वाढताना पाहून ईशानचे वडील आणि राकेश रोशन यांचे भाऊ राजेश रोशनही तिथे आले. त्यानंतर परिस्थिती काहीशी निवळली. याच वेळी राजेश रोशन आणि कुटुंबीयांनी पापाराझींना पोज देत वातावरण थोडं हलक फुलक करण्याचा प्रयत्न केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 2:58 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
नवी नवरी कधीची दारात उभी, इकडे राकेश रोशन यांचा तृतीयपंथीयांशी वाद, नेमकं झालं काय?







