काय होता तो खास प्रसंग?
रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘युनायटेड इन ट्रायम्फ’ या विशेष कार्यक्रमात क्रीडा आणि बॉलीवूड जगतातील दिग्गज एकत्र आले होते. या सोहळ्याला भारतीय क्रिकेटचा 'हिटमॅन' रोहित शर्मा, त्याची पत्नी रितिका सजदेह, बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन, किंग खान शाहरुख खान आणि टी-20 वर्ल्ड कप गाजवणारे भारतीय खेळाडू उपस्थित होते.
advertisement
जेव्हा कार्यक्रमात जेमीमा रॉड्रीग्जला सादरीकरणासाठी बोलावण्यात आलं, तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की पुढे काय होणार आहे.
जेमीमाने स्टेजवर येत 'आशाएँ खिलें दिल की...' हे प्रेरणादायी गाणं गायला सुरुवात केली. तिचा आवाज इतका सुरेल आणि आत्मविश्वासपूर्ण होता की, हॉलमध्ये बसलेला प्रत्येक जण मंत्रमुग्ध झाला. विशेष म्हणजे, जेमीमा फक्त चांगलं गातच नव्हती, तर तिच्या आवाजात एक वेगळीच जादू होती. शिवाय तिला सुंदर गिटार देखील वाजवता येत होतं, तिच्या आवाजाला तिने गिटारच्या संगिताची जी जोड दिली, त्यामुळे हे गाणं ऐकताना आणखीच कौतुक आणि उत्साह जाणवत होता.
हे सादरीकरण पाहून समोर बसलेला रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे होते. जेमीमामध्ये इतकं टॅलेंट लपलेलं आहे, हे पाहून रोहित शर्मालाही आपला आनंद लपवता आला नाही. तो अक्षरशः शॉक झाला होता.
जेमीमा रॉड्रीग्ज ही केवळ एक उत्कृष्ट क्रिकेटपटूच नाही, तर ती एक उत्तम गिटार वादक आणि गायिका देखील आहे, हे यामुळे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जर ती तुम्हाला आजपर्यंत उत्तम क्रिकेटर म्हणून आवडत असेल तर आजपासून गायक म्हणून देखील आवडेल. यापूर्वीही सोशल मीडियावर तिने गिटार वाजवतानाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र, अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांच्यासारख्या दिग्गजांसमोर इतक्या ताकदीने गाणं सादर करणं ही काही साधी गोष्ट नाही.
तिचं हे गाणं आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू केला आहे. नेटकरी म्हणत आहेत की, "जेमीमा क्रिकेटमध्ये जितकी 'क्लास' आहे, तितकीच तिच्या सिंगिंगमध्येही 'मॅजिक' आहे."
खेळ असो वा कला, भारतीय खेळाडू प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव गाजवत आहेत. जेमीमा रॉड्रीग्जने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. तुम्ही जर अजून तिचं हे गाणं ऐकलं नसेल, तर नक्की ऐका; तुम्हीही तिच्या आवाजाच्या प्रेमात पडाल.
