बुधवारी रात्री सुमारे 1:50 वाजता, एका अज्ञात हल्लेखोराने गाडीमधून कॅफेवर तब्बल 8 ते 10 गोळ्या झाडल्या. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, पण कॅफेच्या भिंतींवर आणि खिडक्यांवर गोळ्यांची चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत. हल्लेखोराने या घटनेचा व्हिडिओ स्वतः शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला, ज्यामुळे ही बातमी तासाभरात जगभर पसरली.
advertisement
एक दहशतवादी करत होता फायरिंग, दुसरा बनवत होता LIVE VIDEO, कपिल शर्मा कॅफे हल्ल्याचं भयानक दृश्य
या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी आणि बब्बर खालसा इंटरनॅशनलचा सदस्य हरजीत सिंग लड्डी याने घेतली आहे. त्याने कपिल शर्माने ‘निहंग शीख’ समुदायाबाबत दिलेल्या कथित विधानावरून हा हल्ला केल्याचा दावा केला आहे. सोशल मीडियावर हरजीत आणि ‘तूफान’ नावाच्या दुसऱ्या इसमाने कपिलला माफी मागण्याची धमकीही दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, माफी न मागितल्यास परिस्थिती आणखी गंभीर होईल.
कॅफेवरील गोळीबारावर कपिल शर्माची प्रतिक्रिया
या घटनेनंतर कपिल शर्माने आपल्या चाहत्यांसोबत एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. कॅप्स कॅफेच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले आहे, "प्रेम, समुदाय आणि डिलीशियस कॉफेद्वारे सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी आम्ही हे कॅफे उघडले. पण या स्वप्नात हिंसाचाराचा हस्तक्षेप झाला."
Kapil Sharma Cafe Firing
पुढे लिहिलं, "आम्ही अजूनही धक्क्यात आहोत, पण हार मानणार नाही. आम्हाला प्रेम, आशीर्वाद आणि सहानुभूती देणाऱ्या सर्वांचा मनापासून आभारी आहोत." कॅनडामधील स्थानिक पोलिसांचेही आभार मानले. कपिल शर्माचा हा नवीन व्यवसाय सुरू होऊन फक्त आठवडाभर झाला होता. अशा धक्कादायक घटनेमुळे त्यांच्या कॅफेच्या सुरुवातीलाच संकट उभं राहिलं आहे. मात्र, सोशल मीडियावर लाखो चाहते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.