Kapil Sharma Cafe Firing: एक दहशतवादी करत होता फायरिंग, दुसरा बनवत होता LIVE VIDEO, कपिल शर्मा कॅफे हल्ल्याचं भयानक दृश्य

Last Updated:

Kapil Sharma Cafe Firing Video: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये नवीन कॅफे सुरु केलं. मात्र या कॅफेवर हल्ला झाला. हल्लेखोराने कॅफेवर गोळीबार केला.

कपिल शर्मा कॅफे हल्ल्याचं भयानक दृश्य
कपिल शर्मा कॅफे हल्ल्याचं भयानक दृश्य
मुंबई :  प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने काही दिवसांपूर्वीच कॅनडामध्ये नवीन कॅफे सुरु केलं. मात्र या कॅफेवर हल्ला झाला. हल्लेखोराने कॅफेवर गोळीबार केला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओने इंटरनेटवर एकच खळबळ उडवली आहे.

काय घडलं नेमकं?

कपिल शर्मा आणि त्यांच्या पत्नी गिन्नी चतरथ यांनी नुकतेच कॅनडामध्ये एक कॅफे सुरु केले होते. 'द ग्रेट इंडियन कपिल शो' या नेटफ्लिक्सवरील कॉमेडी शोच्या यशानंतर कपिलने व्यवसायिक क्षेत्रातही पाऊल टाकले. कॅफेची ओपनिंग जोरात झाली होती आणि अनेक भारतीय चाहत्यांनी याला पसंती दिली होती.
advertisement
मात्र, काही दिवसांपूर्वी एका अनोळखी व्यक्तीने कपिलच्या कॅफेवर गोळीबार केला. व्हिडिओमध्ये दिसतं की एक गाडीतून अज्ञात इसमाने 10 राउंड गोळ्या झाडल्या. पहिल्या दोन गोळ्या झाडल्यानंतर काही सेकंदांमध्ये सलग 8 गोळ्या फायर केल्या गेल्या. ही संपूर्ण घटना रात्री घडली असून, रस्त्यावर कोणीही दिसत नाही. हल्ला करणाराच घटनेचा व्हिडीओ बनवत असल्याचं बोललं जातंय.
advertisement
हल्ल्याच्या नंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये कॅफेच्या खिडक्या, भिंती आणि बाहेरच्या भागावर गोळ्यांचे निशाण स्पष्टपणे दिसत आहेत. इमारतीला मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे.

हल्ल्यामागे कोण?

या हल्ल्याची जबाबदारी खलिस्तानी दहशतवादी हरजीत सिंग लड्डी याने स्वीकारली आहे. तो 'बब्बर खालसा इंटरनॅशनल' या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, भारतातील एनआयएने त्याला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिल शर्माच्या एका जुन्या विधानामुळे हरजीत सिंग नाराज होता. त्यातूनच रागाच्या भरात त्याने हा हल्ला घडवून आणल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
advertisement
दरम्यान, सध्या पोलिस आणि सुरक्षा यंत्रणा या घटनेचा सखोल तपास करत आहेत. कपिल शर्मा किंवा त्यांच्या परिवाराकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही. मात्र, या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायामध्येही या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Kapil Sharma Cafe Firing: एक दहशतवादी करत होता फायरिंग, दुसरा बनवत होता LIVE VIDEO, कपिल शर्मा कॅफे हल्ल्याचं भयानक दृश्य
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement