आयुषी डबास मंगळवारच्या एपिसोडमध्ये पाच लाख रुपये जिंकल्या होत्या. बुधवारी प्रसारित झालेल्या एपिसोडची सुरुवात ‘सुपर संधूर’ या खेळाने झाली. त्यांनी 9 प्रश्नांची बिनचूक उत्तरं देत 90 हजार रुपये जिंकले आणि ऑडियन्स पोलही लाईफलाईन त्यांनी वापरली. 7.50 लाख रुपयांच्या 11व्या प्रश्नावर आयुषी डबास अडकल्या आणि ऑडियन्स पोलचा वापर केला. त्यांनी प्रेक्षकांच्या उत्तरावर विश्वास ठेवत आपला खेळ पुढे चालू ठेवला आणि बरोबर उत्तर दिलं. 12 व्या प्रश्नाचं उत्तर देत त्यांनी 12.50 लाख रुपये जिंकले.
advertisement
Bigg Boss 19 : 'बिग बॉस'च्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं; घरातील सगळेच सदस्य नॉमिनेट; कारण काय?
13 व्या प्रश्नावर घेतल्या दोन लाइफलाइन
13 व्या प्रश्नासाठी आयुषी यांनी 50-50 लाइफलाइनचा वापर केला. त्यामुळे दोन चुकीची उत्तर हटवली गेली. त्यानंतर त्यांनी संकेतसूचक (hint-based) लाइफलाइन घेतली आणि अचूक उत्तर दिलं. त्यामुळे त्या 25 लाख रुपये जिंकल्या. पुढे अमिताभ बच्चन यांनी 50 लाख रुपयांसाठी 14 वा प्रश्न विचारला. आयुषी डबासकडे कोणतीही लाइफलाइन उरलेली नव्हती. कोणतीही रिस्क घेण्यास त्या तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.
काय होता 50 लाख रुपयांसाठीचा प्रश्न?
50 लाख रुपयांसाठीचा 14 वा प्रश्न होता -
कोणत्या रॉक बँडने कोलंबिया अंतराळवीरांच्या स्मरणार्थ ‘कॉन्टैक्ट’ हे शेवटचं गाणं लिहिलं होतं? जो अल्बम कल्पना चावला यांनी आपल्या मिशनमध्ये सोबत ठेवला होता?
अचूक उत्तर — डी. डीप पर्पल.
आयुषी यांना द्यायची आहे लोकांना प्रेरणा
'कौन बनेगा करोडपती 17' या कार्यक्रमात दिव्यांग आयुषी दबास म्हणाल्या की,"मी स्वतःला भाग्यवान समजते कारण मला मार्गदर्शन मिळालं. मला असं वाटतं की, जर कुणीही दिव्यांग असो किंवा कुणीही माणूस संघर्ष करताना त्याचा धीर गेलाय तर त्या व्यक्तीला मला इथे बसलेलं पाहून नक्कीच प्रेरणा मिळाली असेल. त्यामुळे माझा हा प्रवास यशस्वी झाला असं मी समजेन". पुढे अमिताभ बच्चन यांनीही आयुषीचं कौतुक केलं.