TRENDING:

आई भाड्याने हवी? 90 कोटींचा सिनेमा देऊन इंडस्ट्री गाजवली, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा

Last Updated:

Marathi Movie : 90 कोटींचा सिनेमा देऊन मराठी इंडस्ट्री गाजवणाऱ्या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. आई भाड्याने हवी? या नावानेच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मराठी इंडस्ट्रीत अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अशातच एका नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. आई भाड्याने हवी? असं सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं हे आगळं वेगळं नाव सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज झालं आहे. पोस्टर पाहून सिनेमाची उत्सुकता वाढली आहे.
News18
News18
advertisement

आई भाड्याने हवी? च्या निमित्तानं मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा स्त्री प्रधान सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  90 कोटींचा सिनेमा देऊन मराठी इंडस्ट्री गाजवणारा मराठमोळा दिग्दर्शक पुन्हा एकदा आई भाड्याने हवी? च्या निमित्तानं एक वेगळी कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

( विक्रम गोखले यांच्या निधनाच्या 3 वर्षांनी त्यांचा शेवटचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला, हृदयस्पर्शी पोस्टर समोर)

advertisement

मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. बाईपण भारी देवा या सिनेमानं 90 कोटींची कमाई करत मराठीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला.

advertisement

सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, “स्त्रीप्रधान विषय हाताळणे ही नेहमीच जबाबदारीची आणि आव्हानात्मक गोष्ट असते. जोपर्यंत एखादी कथा मनापासून भिडत नाही, तोपर्यंत अशा चित्रपटाची सुरुवात करायची नाही, असा माझा ठाम निर्धार होता. ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ आणि 'आई भाड्याने हवी?' या दोन्ही चित्रपटांचे काम 2023 पासून सुरू झाले."

advertisement

"'आई भाड्याने हवी?' हा केवळ विनोदी चित्रपट नाही, तर 'आई' या नात्याचा गाभा मांडणारा, मनाला स्पर्श करून जाणारा अनुभव आहे. मनोरंजनासोबतच विचार करायला लावणं हे माझं ध्येय असतं आणि या चित्रपटात ते प्रकर्षाने जाणवेल. शीर्षकातूनच आजच्या काळातील भावनिक तगमग जाणवते. सध्या कलाकारांची निवड सुरू असून, विविध वयोगटातील 'आई' प्रेक्षकांना पाहायला मिळतील. जून-जुलैमध्ये चित्रीकरणाला सुरुवात होईल", असं केदार शिंदे म्हणाले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रस्त्यावर पैसे मागितले, पण शेवटी ठरवलं अन् ट्रान्सजेंडर मनस्वीनं करून दाखवलं, VIDEO
सर्व पहा

'आई भाड्याने हवी?' या वेगळ्या शीर्षकातूनच प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण होत आहे. आजच्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत ‘आई’ या नात्याची गरज, त्याची उणीव आणि त्यामागची भावनिक पोकळी यावर हा चित्रपट हलक्याफुलक्या तरीही परिणामकारक पद्धतीने भाष्य करणार असल्याचे दिसते. एकीकडे धमाल, हसवणूक आणि मनोरंजन, तर दुसरीकडे अंतर्मुख करणारा आशय या दुहेरी ताकदीमुळे 'आई भाड्याने हवी?' हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार, यात शंका नाही. आता या 'आई'च्या शोधाची कथा नेमकी कशी उलगडते, हे पाहाणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
आई भाड्याने हवी? 90 कोटींचा सिनेमा देऊन इंडस्ट्री गाजवली, मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल