TRENDING:

Swanandi Berde: लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने केली मोठी घोषणा, VIDEO शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!

Last Updated:

Swanandi Berde: ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सध्या चर्चेत आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : ज्येष्ठ आणि दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सध्या चर्चेत आली आहे. स्वानंदीने एक मस्त गुडन्यूज शेअर केलीय. तिची पोस्ट पाहून सर्वजण खूप आनंदी असून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने केली मोठी घोषणा,
लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने केली मोठी घोषणा,
advertisement

स्वानंदी बेर्डेने आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात पदार्पण केलं. आता तिने व्यवसायातही पदार्पण केल्याची आनंदाची बातमी दिली आहे. स्वानंदी बेर्डे आता उद्योजिका बनली आहे.

ज्वेलरी डिझायनर ते गोपी बहू, देवोलीना कशी बनली TV ची क्वीन?

स्वानंदीने नुकताच तिचा ज्वेलरी ब्रँड कांतप्रिया लाँच केला आहे. हे नाव केवळ एक ब्रँड नाही, तर तिच्या जीवनाचा भावनिक तुकडा आहे. वडिलांचं नाव लक्ष्मीकांत आणि आईचं नाव प्रिया यांच्या संगमातून हे नाव निर्माण झालं. या ब्रँडमधून ती आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाला आणि आठवणींना सलाम करतेय.

advertisement

बेर्डे कुटुंबाचं नातं सिनेमाशी घट्ट जोडलेलं आहे. भाऊ अभिनय बेर्डे सिनेमात आपली छाप पाडतोय, पण स्वानंदीने मात्र “अभिनयानंचक उद्योजकता” हा मार्ग निवडला. तिच्या मते, काही स्वप्नं ही फक्त करिअरची नसतात, ती भावनांमधून जन्म घेतात.

दरम्यान, सोशल मीडियावरून प्रचंड शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मराठी सिनेमातील अनेक कलाकारांनीही तिच्या धाडसी पावलाचं कौतुक केलं आहे. “स्वानंदीने वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे, जी प्रेरणादायी आहे”, असं अनेकांनी म्हटलं आहे.

advertisement

स्वानंदी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तिचे मोठे फॉलोअर्स आहेत. ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मराठी बातम्या/मनोरंजन/
Swanandi Berde: लक्ष्मीकांत बेर्डेची लेक स्वानंदीने केली मोठी घोषणा, VIDEO शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल