दारूच्या नशेत प्रसिद्ध अभिनेत्यानं 53 वर्षीय वृद्धाला उडवलं. वृद्धावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात अभिनेत्यानं वृद्धाला उडवलं आणि त्यानंतर दारूच्या नशेत रस्त्यात लोळून तमाशा केला.
( 32 सुपरहिट सिनेमा, तरी सोडली सिनेसृष्टी; UPSC परीक्ष क्रॅक करुन अभिनेत्री बनलली IAS अधिकारी )
advertisement
ही घटना केरळमध्ये घडली असून प्रसिद्ध मल्याळम टेलिव्हिजन अभिनेता सिद्धार्थ प्रभू याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिनेता सिद्धार्थने दारूच्या नशेत कार चालवत एका निष्पाप लॉटरी विक्रेत्याला उडवलं.
मृत व्यक्तीचे नाव थंगराज (53) असे असून ते तामिळनाडूचे रहिवासी होते. केरळमधील नट्टकम कॉलेज जंक्शन परिसरात ते लॉटरी तिकिटे विकून उदरनिर्वाह करत होते. ही दुर्घटना ख्रिसमसच्या संध्याकाळी एमसी रोडवर घडली होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ प्रभू यांची कार भरधाव वेगात येत थंगराज यांना धडक देऊन पुढे निघून गेली. या अपघातात थंगराज गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अनेक दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर गुरुवारी 1 जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर पोलिसांनी अभिनेता सिद्धार्थ प्रभूला 24 डिसेंबर रोजी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतलं. अभिनेता संपूर्ण दारूच्या नशेत होता. प्राथमिक तपासात आणि ब्रेथलायझर चाचणीत असे निष्पन्न झाले की अपघाताच्या वेळी अभिनेता दारूच्या नशेत वाहन चालवत होता. त्याच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
अभिनेता सिद्धार्थनं केलेल्या या भीषण अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्थानिक नागरिक जखमी थंगराज यांना मदत करताना दिसत आहेत. दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थ प्रभू नागरिकांचा वाद घालताना दिसतोय. अभिनेत्याने केवळं नागरिकांशी नाही तर पोलिसांशीही वाद घातला असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. पोलिसांनी अभिनेत्याला पोलीस वॅनमध्ये बसवून नेल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. चिंगावनम पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अभिनेत्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभिनेता सिद्धार्थ प्रभूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास त्याने 'थट्टीम मुट्टीम' आणि 'उप्पुम मुलकुम' सारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे. तो प्रामुख्यांनं मल्याळम सिनेमात काम करतो. या लोकप्रिय मल्याळम सिटकॉममधील भूमिकांसाठी ओळखले जातात.
