TRENDING:

Miss Universe 2025: पाकच्या सुंदरीवर का भडकला मुस्लिम समाज? 'या' गोष्टीमुळे सुंदरी आली वादात

Last Updated:

फातिमा बॉशचे नाव विजेता म्हणून घोषित होताच संपूर्ण सभागृहामध्ये टाळ्यांच्या कडकडाच्या आवाजाचा नाद घुमू लागला. या वर्षीची स्पर्धा अनेक नाट्यमय घटना, वाद आणि काही अनोख्या कारणांमुळे चर्चेत राहिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मिस युनिव्हर्स 2025 (Miss Universe 2025) स्पर्धा संपला आहे आणि मेक्सिकोच्या फातिमा बॉश हिने विश्वसुंदरीचा प्रतिष्ठित मुकुट पटकावला आहे. तिला 2024 च्या मिस युनिव्हर्स, डेन्मार्कच्या व्हिक्टोरिया केजर थेल्व्हिग हिने हा मुकुट घातला. फातिमा बॉशचे नाव विजेता म्हणून घोषित होताच संपूर्ण सभागृहामध्ये टाळ्यांच्या कडकडाच्या आवाजाचा नाद घुमू लागला. या वर्षीची स्पर्धा अनेक नाट्यमय घटना, वाद आणि काही अनोख्या कारणांमुळे चर्चेत राहिली.
सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
advertisement

पाकिस्तानी सुंदरी रोमा रियाज चर्चेत

यावर्षी पाकिस्तान, पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिराती (UAE) सारख्या मुस्लिम देशांच्या सुंदऱ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. परंतु, पाकिस्तानची प्रतिनिधी रोमा रियाज सर्वाधिक चर्चेत राहिली, विशेषतः तिच्या रंगरूपावरून आणि शारीरिक बांधणीवरून तिला खुद्द तिच्याच देशात खूप ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

फायनलपूर्वी झालेल्या स्विमसूट राउंडमध्ये रोमा रियाज ओढणी घेऊन आली होती. तिने आयव्हरी रंगाचा स्विमसूट परिधान केला होता, जो पूर्णपणे झाकलेला (Fully Covered) होता. याशिवाय, तिने आपल्या पोशाखामागे नेटचा दुपट्टा जोडला होता.

advertisement

या लुकमुळे तिच्यावर टीका झाली. एका युझरने 'दुपट्टा पण स्विमसूट असतो का?' असा प्रश्न विचारला, तर दुसऱ्याने 'ती लग्नाला आली आहे का?' अशी टिप्पणी केली. परंतु, शोमध्ये पूर्णपणे कव्हर राहिल्याबद्दल अनेक लोकांनी तिचे कौतुकही केले.

ईव्हनिंग गाऊन आणि क्रॉसचे प्रतीक

स्विमसूट राउंडनंतर ईव्हनिंग गाऊन राउंडमध्येही रोमा रियाजला टीकेला सामोरे जावे लागले. तिने परिधान केलेला काळ्या रंगाचा शोल्डरलेस गाऊन चर्चेचा विषय ठरला.

advertisement

या गाऊनवर क्रिस्टलचा क्रॉस (Cross) चिन्ह बनवलेला होता, जे ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. रोमाने मंचावर हात जोडून 'नमस्ते' केले आणि क्रॉसचे प्रदर्शन केले. या माध्यमातून तिने पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिश्चन या अल्पसंख्याक समुदायांचे प्रतिनिधित्व केले.

रोमा रियाजने हा काळा गाऊन निवडण्यामागचे कारण एका पोस्टमध्ये स्पष्ट केले. तिने लिहिले:

हा गाऊन अशा लोकांसाठी समर्पित आहे ज्यांना नेहमी कमी लेखले गेले. एक पाकिस्तानी ख्रिश्चन महिला म्हणून जागतिक स्तरावर उभे राहणे आणि पाकिस्तानच्या त्या भागाला सन्मान देणे, ज्याकडे वारंवार दुर्लक्ष केले जाते, ही माझ्यासाठी खूप मोठी वैयक्तिक उपलब्धी आहे. हा गाऊन केवळ एक लुक नाही, तर हे एक प्रेमपत्र आहे.

advertisement

तिने कायदे-आझम मुहम्मद अली जिन्ना यांच्या संकल्पनेचा उल्लेख केला, ज्यामध्ये प्रत्येक समुदायाला (मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, शीख) सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. तिने स्पष्ट केले की पाकिस्तानचा ध्वज एका पांढऱ्या पट्ट्यासह डिझाइन केलेला आहे, जो अल्पसंख्याकांच्या सन्मान आणि संरक्षणाचे वचन आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
टाकाऊ पासून टिकाऊ, प्रदीप यांनी उभारला व्यवसाय, वर्षाला 2 कोटींची उलाढाल, Video
सर्व पहा

रोमाने हा गाऊन पाकिस्तानी अल्पसंख्याकांना समर्पित केला असला तरी, अनेक लोकांना तो आवडला नाही. गाऊनवर असलेल्या ख्रिश्चन क्रॉसच्या प्रतीकामुळे तिची आलोचना झाली आणि लोकांनी म्हटले की तिने फक्त एकाच समुदायाचे नाही, तर संपूर्ण पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारा पोशाख परिधान करायला हवा होता.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Miss Universe 2025: पाकच्या सुंदरीवर का भडकला मुस्लिम समाज? 'या' गोष्टीमुळे सुंदरी आली वादात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल