TRENDING:

'चोली के पीछे' पेक्षाही 'अश्लील', संजय दत्त आणि नोरा फतेहीचं नवं गाणं वादात; 24 तासातचं बॅनची मागणी

Last Updated:

Sanjay Dutt Controversial Song: आता एका नव्या गाण्यामुळे पुन्हा वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचा संजूबाबा या गाण्यामध्ये ठेका धरताना दिसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड सिंगर आणि रॅपर बादशाहला त्याच्या टटीरी या नव्या गाण्यामुळे भारतीय प्रेक्षकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. या गाण्यात गणवेशातील शालेय मुली दाखवून गाण्यातील असभ्य बोलांवर त्यांचा डान्स दाखवण्यात आला होता. यावरून खूप गदारोळ झाला होता. अशातच आता एका नव्या गाण्यामुळे पुन्हा वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचा संजूबाबा या गाण्यामध्ये ठेका धरताना दिसला आहे.
News18
News18
advertisement

बादशाहनंतर आणखी एका गाण्यावर प्रेक्षकांचा संताप

काही तासांपूर्वीच 'केडी- द डेव्हिल' या सिनेमातील 'सरके चुनर तेरी सरके' हे गाणं रिलीज झालं होतं. सुरुवातीला सामान्य वाटणाऱ्या या गाण्याचे बोल कालांतराने अश्लील वाटू लागतात. रिलीज झाल्याच्या काही तासांतच हे गाणं तुफान व्हायरल झालं असून यातील अश्लील शब्दरचनेमुळे प्रेक्षकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे. या गाण्यात संजय दत्तसोबत लोकप्रिय डान्सर नोरा फतेहीने स्क्रीन शेअर केली असून प्रेक्षकांनी गाण्यातील बोल आणि डान्सवरून संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. हे गाणं मंगलीने गायलं असून रकीब अलीने हे गाणं लिहिलं आहे आणि अर्जुन जान्याने याला संगीत दिलं आहे.

advertisement

'तिने माझ्या प्रायव्हेट पार्ट्सना...' आधी भर कार्यक्रमात डान्सरला उचलून फेकलं, ट्रोल झाल्यानंतर प्रसिद्ध सिंगरची सारवासारव

संजूबाबाच्या गाण्यावर कायदेशीर कारवाई?

गाणं रिलीज होताच प्रेक्षकांनी यावर नाराजी व्यक्त केली असून बॉलिवूडने आता हद्दच केली आहे अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. इतकंच नाही, तर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी या गाण्याविरुद्ध थेट कारवाई केली आहे. त्यांनी एक ट्विट लिहून याबाबत आपली नाराजी व्यक्त केली असून बॉलिवूड, तसेच सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. प्रियंक यांनी लिहिले, "बॉलिवूड कडून नैतिकतेची अपेक्षा आता उरलेली नाहीच, पण सेन्सॉर बोर्डाने अश्लीलतेला परवानगी देणे हे अत्यंत लाजिरवाणे आहे. ही मानसिक विकृती असलेली मंडळी आपल्या विकृत विचारांनी पिढ्यानपिढ्या बिघडवत आहेत. आम्ही ही घाण समाजात पसरू देणार नाही. याबाबत कारवाईसाठी नोटीस जारी करत आहोत."

advertisement

दरम्यान, 'सरके चुनर तेरी सरके' या गाण्यात नोरा फतेहीचा एनर्जेटिक डान्स आणि संजूबाबाचा नेहमीचा स्वॅग पाहायला मिळत आहे. या गाण्यात पदर पडण्यासारख्या काही असभ्य स्टेप्सही दाखवण्यात आल्या असून नेटकऱ्यांनी याची तुलना थेट भोजपुरी गाण्यांशी केली आहे. इतकंच नाही, तर हे गाणं भोजपुरी गाण्यांपेक्षाही वाईट असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.

advertisement

याआधी १९९३ साली रिलीज झालेल्या खलनायक या चित्रपटातील चोली कें पीछे क्या हैं या गाण्यामुळेही खळबळ उडाली होती. या गाण्याच्या गायिका इला अरुण यांना या गाण्यासाठी फिल्मफेअरचा पुरस्कार मिळाला असला तरीही त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात हे गाणं न गाण्याची मागणी करण्यात आली होती. इतकंच नाही, तर त्यावेळची लोकप्रिय वाहिनी दुरदर्शनने हे गाणं बॅन केलं होतं.

कधी रिलीज होणार फिल्म?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
द्राक्षला 12000 रुपये भाव, लिंबू दरही तेजीत, कांद्याची काय स्थिती? Video
सर्व पहा

डायरेक्टर प्रेम दिग्दर्शित 'केडी- द डेव्हिल' ही फिल्म कन्नड भाषेतील एक मोठा प्रोजेक्ट असून ती पॅन इंडिया रिलीज केली जाणार आहे. यामध्ये ध्रुव सरजा लीड रोलमध्ये आहे, तर शिल्पा शेट्टी, वी रविचंद्रन आणि इतर कलाकारही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही फिल्म ३० एप्रिलला थिएटर्समध्ये दाखल होणार आहे. तथापि, या गाण्यामुळे निर्माण झालेला वाद फिल्मच्या कमाईवर काय परिणाम करतो पाहावे लागेल.

मराठी बातम्या/मनोरंजन/
'चोली के पीछे' पेक्षाही 'अश्लील', संजय दत्त आणि नोरा फतेहीचं नवं गाणं वादात; 24 तासातचं बॅनची मागणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल