दूरदर्शनवरील शक्तिमान फेम अभिनेता मुकेश खन्ना यांनी जया बच्चन यांच्या या वागण्यावर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले “पत्रकार आणि चाहत्यांशी तिचे वागणे चुकीचे आहे. ती सतत रागीट दिसते. संसदेतसुद्धा ती अनेकदा मोदीजींच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दे शोधते.”
'त्या कुटुंबाने माझ्याभोवती गर्दी करुन...' जया बच्चन प्रकरणावर मराठी अभिनेत्रीची पोस्ट
फिल्मी ज्ञानसोबत बोलताना मुकेश खन्ना म्हणाले, आजकाल त्यांचं पत्रकारांसोबत, पापाराझींसोबत जे वागणं आहे, कोण आहेस तू? काय पाहिजे? हे फार चुकीचं आहे. मुकेश खन्नाच्या मतावर अनेकांनी सहमती दर्शवली.
advertisement
अभिनेत्री कंगना राणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जया यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांना ‘बिघडलेली आणि विशेषाधिकारप्राप्त महिला’ म्हटले. तिने एवढेच नव्हे तर, “लोक तिचा राग सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे” अशी टिप्पणी केली. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनीही ट्विटरवरून जया बच्चन यांचा निषेध केला. त्यांनी लिहिले “ज्यांना जनतेने निवडून दिले आहे, त्यांच्याशी असा अपमानकारक वर्तन करणे शोभादायक नाही. तिच्या दर्जाच्या कलाकाराकडून विनम्रता आणि आदर अपेक्षित आहे.”
दरम्यान, याआधीही जया बच्चन पापाराझींवर ओरडताना आणि चिडताना अनेक वेळा कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. मात्र यावेळी त्यांनी साध्या चाहत्याला ढकलल्यामुळे हा मुद्दा अधिक गंभीर ठरला आहे.
