ख्रिस्टलची साद आणि मुनव्वरचा डान्स
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री ख्रिस्टल डिसूजा मुनव्वरला डान्स करण्यासाठी ओढताना दिसतेय. सुरुवातीला "मला स्टेप्स माहीत नाहीत" असा बहाणा करणारा मुनव्वर गाणं सुरू होताच मात्र असा काही थिरकला की त्याने प्रोफेशनल डान्सरलाही मागे टाकलं. मुनव्वरने केलेला हा डान्स पाहून पार्टीत एकच जल्लोष झाला.
advertisement
बायको मेहजबीनचं रिएक्शन कसं होतं?
जेव्हा मुनव्वर आपल्या एक्स आयशा खानच्या गाण्यावर नाचत होता, तेव्हा सर्वांच्या नजरा त्याची पत्नी महजबीन कोटवाला हिच्याकडे होत्या. मुनव्वर आणि आयशाचं 'बिग बॉस'मधील भांडण संपूर्ण देशाने पाहिलं आहे. मात्र, महजबीनने अत्यंत समजूतदारपणा दाखवत मुनव्वरच्या डान्सवर टाळ्या शिट्ट्या वाजवून त्याला दाद दिली. आपल्या पतीच्या आनंदात ती पूर्णपणे सहभागी झालेली दिसली, ज्यामुळे ट्रोलर्सच्या तोंडावर आपोआपच कुलूप लागलं.
सेलेब्सच्या गर्दीत मुनव्वरच्या वाढदिवसाचा थाट
मुनव्वरच्या या बर्थ-डे बॅशला सोनाली बेंद्रे, अरबाज खान, समय रैना, ओरी, अंकिता लोखंडे, अली गोनी, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांसारख्या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. मुनव्वरच्या आयुष्यात आलेली ही स्थिरता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.
मुनव्वरच्या खासगी आयुष्यात अनेक चढ-उतार आले आहेत. 'लॉकअप'मध्ये त्याच्या पहिल्या लग्नाचा आणि मुलाचा खुलासा झाला होता. त्यानंतर 'बिग बॉस १७' मध्ये आयशा खानने एन्ट्री घेऊन त्याच्यावर डबल डेटिंगचे आरोप केले होते. मात्र, या सर्व वादांना मागे टाकत मुनव्वरने मेकअप आर्टिस्ट महजबीन कोटवालाशी गुपचूप लग्न करून आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
