मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेलर लाँच प्रेस कॉन्फरन्सला तब्बल 1 तास उशीर झाला. या विलंबामुळे नाना पाटेकर नाराज झाले आणि कोणालाही न सांगता ते कार्यक्रमातून उठून निघून गेले. नानांच्या या वागण्यामुळे उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. विशेष म्हणजे शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी हे स्टेजवर असतानाच नाना पाटेकर कार्यक्रमातून बाहेर पडले.
advertisement
( शाहिद कपूरच्या O Romeoमध्ये नाना पाटेकरांबरोबर हा मराठी गायक, ट्रेलरमध्ये दिसला डॅशिंग अवतार )
नाना पाटेकर कार्यक्रमात नसतानाच दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी त्यांच्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. PTI ने शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशाल भारद्वाज म्हणतात, "नाना पाटेकर उठून गेले याचं मला वाईट वाटलं नाही. ते असेच आहेत. ते असते तर नक्कीच चांगलं वाटलं असतं पण ते नाहीत."
विशाल भारद्वाज पुढे म्हणाले, "नाना म्हणजे शाळेतला तो बदमाश मुलगा. जो सगळ्यांना बुली करायचा. आता सगळ्यात जास्त एंटरटेन करतो आणि ज्याच्यासोबत सगळ्यांना राहावंसं वाटतं. नानांमध्ये हे सगळं आहे."
नाना पाटेकर कार्यक्रमातून का गेले याबाबत बोलकाना विशाल भारद्वाज म्हणाले, "आमची 27 वर्षांची मैत्री आहे आणि हे पहिल्यांदाच आम्ही एकत्र काम करत आहोत. जर ते कार्यक्रमात थांबले असते तर छान वाटलं असतं. पण त्यांनी त्यांच्या सिग्नेचर स्टाइलमध्ये सांगितलं, "1 तास वाट पाहायला लावलं, मी जातो." आम्हाला याचं काहीच वाईट वाटलं नाही कारण हेच नानांना नाना पाटेकर बनवतं."
