'ओ रोमियो' सिनेमाच्या ट्रेलर लाँच आधीच अभिनेते नाना पाटेकर कार्यक्रमातून निघून गेले. सगळ्यांनी नानांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण नानांच्या रागापुढे कोणाचंच चाललं नाही. नानांनी त्यांचं क्रांतिवीर रुप दाखवलं. त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळे बॉलिवूडकर शॉक झाले.
( शाहिद कपूरच्या O Romeoमध्ये नाना पाटेकरांबरोबर हा मराठी गायक, ट्रेलरमध्ये दिसला डॅशिंग अवतार )
advertisement
मीडिया रिपोर्टनुसार, नाना पाटेकर दुपारी 12 वाजता कार्यक्रमात पोहोचले. तोपर्यंत सिनेमाचे मुख्य कलाकार शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी आलेच नाहीत. ते दुपारी सुमारे दीड तास उशिरा पोहोचले. असे वृत्त आहे की दोन्ही कलाकार जवळच्या सिनेमागृहात सिनेमाचं पोस्टर लाँच करण्यात बिधी होते, ज्यामुळे मुख्य कार्यक्रम उशिरा सुरू झाला.
बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, नाना पाटेकर यांनी इव्हेंटमधून निघायचं ठरवलं. ते थिएटरमधून बाहेर आले. त्यांना तिथल्या लोकांनी सर थोडा वेळ थांबा म्हणत थांबण्याची विनंती केली. पण नाना कोणाचंच ऐकलं नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय की एक व्यक्ती लिफ्टपर्यंत नानांना थांबवण्याचा प्रयत्न करतेय पण नाना त्या व्यक्तीला हातातील घडाळ्याची वेळ दाखवताना दिसत आहेत. नानांचं असं निघून जाणं उपस्थितांसाठी शॉकिंग होतं.
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांची प्रतिक्रिया दिली. ते हसत म्हणाले, "नानाजी इथे असते तर खूप छान झाले असते, पण तो त्याच्या खास शैलीत उठला आणि म्हणाला, तुम्ही मला एक तास वाट पाहायला लावली आहे, मी आता जातो. तो त्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळेच तो नाना पाटेकर आहे. "
दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा "ओ रोमियो" हा एक गँगस्टर ड्रामा आहे. 13 फेब्रुवारी 2026 रोजी हा सिनेमा रिलीड होणार आहे. शाहिद, तृप्ती आणि नाना पाटेकर यांच्या व्यतिरिक्त, या सिनेमात विक्रांत मॅसी, तमन्ना भाटिया आणि फरीदा जलाल, राहुल देशपांडे यांसारखे दिग्गज कलाकार देखील आहेत.
