TRENDING:

'अजित पवारांच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदाच...', भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी, VIDEO

Last Updated:

Ajit Pawar: एका सार्वजनिक कार्यक्रमात नाना भाषण करत होते आणि शेजारी बसलेले अजितदादा आपल्याच विचारात मग्न होते. नानांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी भर सभेत दादांची खोड काढली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नियतीचा खेळ खरोखरच अजब असतो. २८ जानेवारी २०२६ चा तो काळा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत करून गेला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण राज्य अजूनही सुन्न आहे. शासकीय इतमामात पार पडलेले अंत्यसंस्कार आणि जनसागराचा तो महापूर दादांच्या लोकप्रियतेची साक्ष देऊन गेला. मात्र, राजकीय गदारोळापासून दूर, कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईटपासून लांब, दादांचा एक असा कोपरा होता जिथे ते फक्त 'अजित' असायचे. तो कोपरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं घर आणि त्यांची मैत्री.
News18
News18
advertisement

दोन स्पष्टवक्ते अन् एक घट्ट मैत्री

अजित पवार आणि नाना पाटेकर हे दोन व्यक्ती म्हणजे जणू दोन भिन्न टोकं. पण त्यांच्या स्वभावात एक समान धागा होता, तो म्हणजे कमालीचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाची शिस्त. नानांना दादांच्या कामाचा उरक आवडायचा, तर दादांना नानांचं समाजकार्य आणि त्यांचा साधेपणा भावयाचा. राजकारणाच्या धावपळीतून थकले-भागले की दादा अनेकदा नानांच्या फार्महाऊसवर पोहोचायचे. तिथे कोणताही प्रोटोकॉल नसायचा, केवळ साध्या जेवणाची ताटं आणि मनापासून मारलेल्या गप्पा असायच्या.

advertisement

जेव्हा नानांनी घेतलेली दादांची फिरकी

दादांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. यात २०१६ सालचा एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झालाय. एका सार्वजनिक कार्यक्रमात नाना भाषण करत होते आणि शेजारी बसलेले अजितदादा आपल्याच विचारात मग्न होते. नानांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटलं नाही. त्यांनी भर सभेत दादांची खोड काढली.

advertisement

'उद्या कोणी मला विचारलं...', गौरव मोरेने का सोडली 'हास्यजत्रा'? पहिल्यांदाच सांगितलं खरं कारण

नाना मिश्किलपणे म्हणाले, "अजित, तुझं लक्ष दुसरीकडे आहे. मी फार महत्त्वाचं बोलतोय. कोण आहे मनामध्ये या क्षणाला सांग. खरं सांग, असा अगदी हरवल्यासारखा का झालास? काही तरी गोंधळ आहे." नानांच्या या गुगलीवर दादा चक्क लाजून लाल झाले होते. नाना पुढे म्हणाले, "अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदाच पाहिली. छान! तू लाजलेलाही मला खूप आवडतोस." हे बोलून नाना खळखळून हसले. नानांचा हा विनोद ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला होता, पण आज तो व्हिडिओ पाहून डोळ्यांच्या कडा ओलावतात.

advertisement

मल्हार पाटेकरची ती भावूक पोस्ट...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
घरातील सगळेच खातील आवडीने, पारंपरिक पद्धतीने बनवा सोयाबीन चिली, रेसिपीचा Video
सर्व पहा

नानांचे सुपुत्र मल्हार पाटेकर याने दादांच्या निधनानंतर काही अतिशय दुर्मिळ आणि खाजगी फोटो शेअर केले होते. या फोटोंमध्ये अजितदादा नानांच्या निसर्गरम्य ठिकाणी निवांत बसलेले दिसत आहेत. मल्हारने लिहिलंय, "माननीय अजित दादा पवार साहेबांचे जाणे हे आमच्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. ते आमच्यासाठी कुटुंबाचाच एक भाग होते आणि आयुष्यभर राहतील. त्यांच्यासोबतच्या त्या अविस्मरणीय आठवणी आज मनाला चटका लावून जात आहेत. ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे."

मराठी बातम्या/मनोरंजन/
'अजित पवारांच्या चेहऱ्यावर मी पहिल्यांदाच...', भर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी घेतलेली दादांची फिरकी, VIDEO
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल