'आत्मपॅम्फ्लेट' हा 2023 मध्ये आलेला बहुचर्चित चित्रपट. परेश मोकाशी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, कलर यलो प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओने केली. विशेष म्हणजे 73 व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जनरेशन 14प्लस पुरस्कारासाठी या चित्रपटाला नामांकन मिळाले.हा चित्रपट 6 ऑक्टोबर 2023 रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. पण या चित्रपटाची कथा तयार झाल्यापासून ते थिएटर रिलीज होईपर्यंत दिग्दर्शक आशिष बेंडेला संघर्ष करावा लागला होता.
advertisement
'आत्मपॅम्फ्लेट'च्या स्ट्रगलची कहाणी
'आत्मपॅम्फ्लेट' या चित्रपटाची संहिता परेश मोकाशी यांनी लिहिली आहे. सिनेमाची कथा लिहून झाल्यानंतर ती पटकथा अनेक निर्मात्यांना ऐकवण्यात आली. सर्वच निर्माते संहितेचं भरभरून कौतुक करत होते. पण कोणताही निर्माता या चित्रपटाच्या निर्मितीची रिस्क घ्यायला तयार नव्हता. यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. अखेर कलर यलो प्रॉडक्शनच्या आनंद एल राय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीला हिरवा कंदील दिला. एक वेगळा विषय असणारा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पण स्क्रिन मिळवण्यापासून या चित्रपटाला पुन्हा संघर्ष करावा लागला. दिग्दर्शक आशिष बेंडेने याबद्दल सोशल मीडियावर खास पोस्टदेखील लिहिली होती. पुढे या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारसाठी नामांकन मिळालं...चित्रपटासाठी माऊथ पब्लिसिटी मोठ्या प्रमाणात झाली आणि या चित्रपटाला सुगीचे दिवस आले. आज ओटीटीवरदेखील हा चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात.
कोण आहे आशिष बेंडे?
आशिष बेंडे हा मुळचा पुण्याचा. पुण्यातील अभिनव विद्यालयात त्याचं शालेय शिक्षण झालं. त्यावेळी शाळेजवळ असणाऱ्या FTII ने त्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. पदवीच्या शेवटच्या वर्षाला आल्यानंतर IIS व्हावं, अशी त्याच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लागलेला पुरुषोत्तम करंडकचा बोर्ड त्याने पाहिला आणि सगळं चित्रच बदललं. त्याला सिनेक्षेत्रात येण्याची आवड निर्माण झाली. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडकमध्ये सर्वोत्तम अभिनयाचं पारितोषिक मिळालं. पुढे आई-वडिल दोघांनीही करिअरला पाठिंबा दिला. पाय जमिनीवर ठेवण्यात त्याच्या आईचा मोठा वाटा आहे. तर वडिलांनी चांगले चित्रपट पाहायला शिकवले. चांगल्या गाण्यांपासून ते भजनांपर्यंत सर्वकाही त्यांनी ऐकवलं. त्याचे अर्थही सांगितले. आशिषने अनेक बिग बजेट चित्रपटांत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.