बॉलिवूड अभिनेता नील नितीन मुकेश याच्याबद्दल आपण बोलत आहोत. त्याने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या करिअरच्या सुरुवातीला आलेल्या अडचणींवर भाष्य केले. 'थेरपी डायरीज' या प्लॅटफॉर्मवर बोलताना नीलने सांगितले की त्याच्या गोरा रंग आणि परदेशी दिसणाऱ्या चेहऱ्यामुळे लोक त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहायचे.
( एकीकडे गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे भाचीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, व्हिडीओ आला समोर )
advertisement
नील म्हणाला, “लोक मला म्हणायचे की मी इंग्रजांच्या मुलासारखा दिसतो.त्यामुळे मला हिंदी येते का असा प्रश्न त्यांना पडायचा. माझ्या हिंदीवरून ते माझी खिल्ली उडवायचे.”
कुटुंबाची पार्श्वभूमीसुद्धा बनली आव्हान
नील नितीन मुकेश हा पार्श्वगायक नितीन मुकेश यांचा मुलगा आणि दिग्गज गायक मुकेश यांचा नातू आहे. त्याचं म्हणणं आहे की, अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवताना त्याच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीनेही लोकांच्या अपेक्षा आणि शंका वाढवल्या. "मी गायकाच्या घरातून आलो आहे. त्यामुळे लोक म्हणायचे, हा अभिनय कसा करेल? ही एक वेगळीच लढाई होती," असं तो म्हणतो.
अभिनयाची आवड आणि प्रयत्न
नीलने 1988 आणि 1989 मध्ये ‘विजय’ आणि ‘जैसी करनी वैसी भरनी’ या सिनेमात बालकलाकार म्हणून काम केलं. त्यानंतर 2002 मध्ये 'मुझसे दोस्ती करोगे' या सिनेमात सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं. 2007 मध्ये त्याने 'जॉनी गद्दार' सिनेमातून प्रमुख अभिनेता म्हणून पदार्पण केले. 2024मध्ये त्याचा 'हिसाब बराबर' हा सिनेमा रिलीज झाला.
स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळे यश मिळवले
नील म्हणाला, “मला काहीही करून ही संधी मिळवायची होती. मी भीतीला किंवा शंकेला माझ्यावर प्रभाव टाकू दिला नाही. पर्यायच नव्हता. मला माझं स्वप्न सत्यात उतरवायचं होतं.”