एकीकडे गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे भाचीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, व्हिडीओ आला समोर
- Published by:Minal Gurav
Last Updated:
arti singh re marriage : एकीकडे गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याची भाजी आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. आरतीच्या लग्नाचा व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आहे. गोविंदा आणि सुनिता यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा आहेत. दोघेही घटस्फोट घेणार आहेत असं बोललं जात आहे. एकीकडे गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याची भाजी आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंह हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. आरतीने 2024मध्येच लग्न केलं होतं. तिच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच आरतीने दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. आरतीच्या दुसऱ्या लग्नाचा व्हिडीओ तिने शेअर केला आहे.
आरतीने 2024मध्ये बिझनेसमन दीपक चौहानसोबत लग्न केलं. लग्नाला एक वर्ष पूर्ण होताच दोघांनी पुन्हा एकदा लग्न करायचं ठरवलं.दोघेही सध्या उत्तराखंडमध्ये त्यांची फर्स्ट वेडिंग एनिवर्सरी सेलिब्रेट करत आहेत. दोघांनाही चाहत्यांकडून लग्नाच्या शुभेच्छा मिळत आहेत.
त्रियुगीनारायण मंदिरात पार पडला पुन्हा विवाहसोहळा
advertisement
फर्स्ट वेडिंग एनिवर्सरी निमित्ताने आरती आणि दीपक उत्तराखंडमधील पवित्र त्रियुगीनारायण मंदिरात पोहोचले. याठिकाणी भगवान शिव आणि माता पार्वती यांचे प्राचीन काळात लग्न झाले होते. मंदिरात आजही पवित्र ज्वाला सतत जळते. या शुभस्थळी आरती आणि दीपकने पुन्हा एकदा सप्तपदी घेतल्या आणि एकमेकांप्रती निष्ठा व्यक्त केली.
जुन्या लग्नाच्या कपड्यांमध्येच साधा सोहळा
या खास प्रसंगी या जोडप्याने नव्या कपड्यांची खरेदी न करता त्यांच्या मूळ लग्नाचेच कपडे परिधान केले. आरतीने सुंदर साडी परिधान केली होती तर दीपकने पांढऱ्या भरतकामाची शेरवानी घातली होती. दोघंही अतिशय गोड आणि भावनिक दिसत होते.
advertisement
advertisement
आरती सिंहने शेअर केला खास व्हिडिओ
आरतीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या सोहळ्याचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले, "दीपकला नेहमीच त्रियुगीनारायण मंदिरात लग्न करायचं होतं. त्यामुळे फर्स्ट वेडिंग एनिवर्सरीला आम्ही इथे पुन्हा लग्न केलं. हा क्षण आमच्यासाठी खूपच पवित्र आणि खास आहे. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या आशीर्वादाने आमचं नातं आणखीन बळकट होवो."
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 29, 2025 7:59 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकीकडे गोविंदाच्या घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे भाचीनं दुसऱ्यांदा केलं लग्न, व्हिडीओ आला समोर