TRENDING:

नेटफ्लिक्सचा धमाका! एकापाठोपाठ 18 नवीन सिनेमे आणि सीरिजची घोषणा; पाहा संपूर्ण यादी!

Last Updated:

Netflix Upcoming Movies/Series: नेटफ्लिक्सने येत्या काळात रिलीज होणाऱ्या तब्बल १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : सर्वांत मोठं ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या नेटफ्लिक्स इंडियाने आज आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिनाच खुला केला आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात नेटफ्लिक्सने येत्या काळात रिलीज होणाऱ्या तब्बल १८ नवीन चित्रपट आणि वेब सीरिजची घोषणा केली आहे. यामध्ये थ्रिलर, कॉमेडी, कोर्टरूम ड्रामा आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, बॉलिवूडचे दिग्गज सुपरस्टार्स आता थेट तुमच्या मोबाईल आणि टीव्ही स्क्रीनवर एन्ट्री करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
News18
News18
advertisement

सनी पाजी आता ओटीटीवर

या संपूर्ण घोषणेमध्ये सर्वात जास्त चर्चा रंगली आहे ती म्हणजे अ‍ॅक्शन किंग सनी देओल यांच्या ओटीटी पदार्पणाची. सनी देओल 'इक्का' (Ikka) या चित्रपटातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर डेब्यू करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या टीझरमध्ये सनी पाजी पुन्हा एकदा वकिलांच्या गणवेशात दिसत असून, त्यांच्यासमोर 'बॉर्डर'मधील त्यांचा जोडीदार अक्षय खन्ना उभा आहे. अक्षय या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असून हा एक हाय-व्होल्टेज कोर्टरूम ड्रामा असणार आहे.

advertisement

Apurva Gore: 'आई कुठे काय करते' फेम 'ईशा' चढणार बोहल्यावर! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा

सैफ अली खानचा डबल धमाका

सैफ अली खान देखील नेटफ्लिक्सवर आपला दबदबा निर्माण करण्यासाठी तयार आहे. या यादीत सैफच्या दोन मोठ्या चित्रपटांचा समावेश आहे. 'कर्तव्य' आणि 'हम हिंदुस्तानी' या दोन भिन्न विषयांवरील चित्रपटांतून सैफ प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. याशिवाय भुवन बामच्या 'ढिंडोरा २' ची प्रतीक्षा आता संपणार असून, कॉमेडीचा तडका लावण्यासाठी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चं ५ वं पर्व देखील लवकरच भेटीला येत आहे.

advertisement

नेटफ्लिक्सवर झळकणार 18 सिनेमे आणि सीरिज

चित्रपट : इक्का, घूसखोर पंडत, गांधारी, कर्तव्य, मेड इन कोरिया, हम हिंदुस्तानी, टोस्टर

वेब सीरिज : लेगेसी, मुसाफिर कॅफे, हॅलो बच्चों, ढिंडोरा २, फॅमिली बिझनेस, सुपर बाबू, चुंबक, #लव्ह

शो/इतर : द ग्रेट इंडियन कपिल शो ५, तक्षकूडु, ये दिल सुन रहा है

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

'तक्षकूडु' सारख्या प्रोजेक्टमधून प्रादेशिक कथांना जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. तसेच तापसी पन्नूची 'गांधारी' ही सीरिज महिलाप्रधान थ्रिलर म्हणून चर्चेत आहे. कौटुंबिक ड्रामा आवडणाऱ्यांसाठी 'फॅमिली बिझनेस' आणि कॉलेज लाईफवर आधारित 'हॅलो बच्चों' यांसारख्या सीरिज तरुणाईला भुरळ घालतील.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
नेटफ्लिक्सचा धमाका! एकापाठोपाठ 18 नवीन सिनेमे आणि सीरिजची घोषणा; पाहा संपूर्ण यादी!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल