प्रसिद्ध गायिका तिच्या ठरलेल्या कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम सुरू असताना अचानक गायिकेची तब्येत खालावली. गायिकेची तब्येत बिघडल्याने उपस्थित सगळेच घाबरले. गायिकेचं गाणं ऐकण्यासाठी आतूर असलेले प्रेक्षक काळजीत पडले. गायिकेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे गेल्यानंतर असं काही धक्कादायक घडलं आणि पुढच्या काही तासात गायिकेचा मृत्यू झाला.
( आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप, अनन्या पांडे पुन्हा प्रेमात! विदेशी मॉडेलला करतेय डेट; केलं कन्फेस )
advertisement
गीता पटनायक असं गायिकेचं नाव असून त्या प्रसिद्ध ओडिया गायिका होत्या. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्या एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथेच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना त्वरित कटकच्या कॅपिटल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचं समोर आलं. त्यांना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारांती त्यांचं निधन झालं. त्यांचं पार्थिव त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
गीता पटनायक यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्या गेली पाच दशकांहून अधिक काळ इंडस्ट्रीत काम करत आहेत. त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं. त्यांनी अनेक लोकप्रिय ओडिया गाण्यांना त्यांचा आवाज दिला आहे. जाजाबार आणि फुर किना उदिगला बानी ही त्यांनी काही लोकप्रिय गाणी आहेत.
