'कुली'
सुपरस्टार रजनीकांतचा अॅक्शनपट कुली फक्त थिएटरमध्ये धुमाकूळ घालून थांबलेला नाही, तर आता तो थेट ओटीटीवर येत आहे. 11 सप्टेंबरपासून प्राइम व्हिडिओवर तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड भाषेत हा उपलब्ध होणार आहे त्यामुळे हिंदी प्रेक्षकांना मात्र अजून थांबावं लागणार आहे.
याला म्हणतात सस्पेन्स..! क्लायमॅक्स डोकं फिरवणारा, ओटीटी ट्रेंडिंग थ्रिलर सिनेमा तुम्ही पाहिला का?
advertisement
'डू यू वॉना पार्टनर’
तमन्ना भाटिया आणि डायना पेंटी यांची धमाल जोडी या सिरीजमधून प्रेक्षकांना भेटणार आहे. हा रोमँटिक कॉमेडी सिनेमा 12 सप्टेंबर रोजी रिलीज होतोय. प्राइम व्हिडिओ तुम्ही हा पाहू शकता.
'सैयारा'
अहान पाडे अनीत पड्डा स्टारर हा सिनेमा ओटीटीवर येत आहे आहे. 12 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. मोहित सुरी दिग्दर्शित हा सिनेमा आता तुम्ही ओटीटीवरही पाहू शकणार.
‘द गर्लफ्रेंड’
ही मालिका मानसशास्त्र, नातेसंबंध आणि गुंतागुंतीच्या ट्विस्टने भरलेली आहे. 10 सप्टेंबर ला ही प्राइम व्हिडिओवर ही रिलीज होणार आहे.
‘द डेड गर्ल्स’
ही सिरीज आता लवकरच ओटीटीवर दाखल होणार आहे. यंदाच्या आठवड्यात तुम्ही घरबसल्या याचा आनंद घेऊ शकता. 10 सप्टेंबरला ही नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
'द रॉंग पॅरिस'
प्रेम आणि हास्याचं मिश्रण असलेली ही कथा, तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता. मिरांडा कॉसग्रोव्ह, पियर्सन फोड स्टारर 12 सप्टेंबर पासून ही ओटीटीवर येत आहे.