समुद्राकाठची हॉट केमिस्ट्री
रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये यश आणि कियारा अडवाणी समुद्राच्या लाटांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांच्या मिठीत दिसत आहेत. यशचा रांगडा लुक, तर पांढऱ्या शुभ्र शर्टमधील कियारा, या दोघांची केमिस्ट्री पोस्टरमध्येच जबरदस्त दिसत आहे. समुद्राच्या लाटांइतकीच या गाण्यातील भावना आणि पॅशन तीव्र असणार आहे, हे पोस्टरवरून स्पष्ट होतंय.
advertisement
विशाल मिश्राचा आवाज अन् संगीताची जादू
हे गाणं प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल मिश्रा याने गायलं असून संगीतबद्धही केलं आहे. विशाल मिश्रा सध्या त्याच्या भावस्पर्शी गाण्यांसाठी ओळखला जातो आणि 'तबाही' गाण्यातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेणार आहे. या चित्रपटाची गाणी एकूण ६ भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, २ मार्चला हे गाणं अधिकृतपणे रिलीज केलं जाणार आहे.
टॉक्सिकची तगडी स्टारकास्ट
गीतू मोहनदास यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट एका गोव्यातील ड्रग कार्टेलवर आधारित गँगस्टर ड्रामा असल्याचं बोललं जातंय. यश या चित्रपटात 'राया' आणि 'तिकीट' अशा दोन वेगळ्या लुकमध्ये दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. कियारा अडवाणीसोबतच या चित्रपटात नयनतारा (यशच्या बहिणीच्या भूमिकेत), हुमा कुरेशी, तारा सुतारिया आणि रुक्मिणी वसंत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
