TRENDING:

एक एक बाल पे काम...! नेटकऱ्यांनी केलं इतकं ट्रोल की प्राजक्ता गायकवाडवर आली हेअरस्टाईल लपवण्याची वेळ? VIDEO

Last Updated:

Prajakta Gaikwad : नव्या हेअर स्टाइलनंतर प्राजक्ता गायकवाडचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. प्राजक्ता तिची हेअर स्टाइल लपवताना दिसतेय?

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या नव्या हेअरस्टाईलमुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या लूकमुळे तिला ट्रोल करण्यात आलं. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत प्राजक्तानं साकारलेल्या येसूबाई या भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनात तिची एक वेगळी आणि आदराची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या हेअर स्टाइलमध्ये चाहत्यांना तिला स्वीकारणं कठीण गेलं.
News18
News18
advertisement

प्राजक्ताच्या नव्या हेअरस्टाईलवर अनेक नेटकऱ्यांनी टीका केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. काही जणांनी तिच्या लूकवर नकारात्मक प्रतिक्रिया देत तिला जोरदार ट्रोल केलं. या वाढत्या ट्रोलिंगमुळे प्राजक्ताने तिच्या पोस्टवरील कमेंट सेक्शन बंद करावं लागलं.

( 'सम्राट' बनून रातोरात मिळाली प्रसिद्धी, तब्बल 7 वर्षांनी मराठी TV वर दिसणार हा अभिनेता )

दरम्यान ट्रोलिंगनंतर प्राजक्ताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तिची हेअर स्टायलिस्ट तिचे केस सेट करताना दिसते. विशेष म्हणजे प्राजक्ताच्या कपाळावरून कापलेले साधना कटसारखे केस हेअरस्टाईलमध्ये लपवण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. मात्र प्राजक्ता खरंच आपली हेअरस्टाईल लपवण्याचा प्रयत्न करत आहे का? की ती एखाद्या नव्या प्रोजेक्टसाठी वेगळा लूक तयार करत आहे याबाबत माहिती समोर आलेली नाही.

advertisement

प्राजक्ताने हा व्हिडिओ शेअर करताना एक मजेशीर कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहिलं आहे, "Hairstylist wor एक एक बाल पे काम कर रहे है". हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही चाहत्यांनी प्राजक्ताला पाठिंबा दिला असून तर अनेकांनी तिला पुन्हा ट्रोल केलं आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अबब! मक्याच्या एका ताटाला चक्क लागली 8 कणीसे, शेतकऱ्याच्या प्रयोगाची गावात चर्चा
सर्व पहा

प्राजक्ता गायकवाडचं डिसेंबर 2025 मध्ये लग्न झालं. शंभुराज खुटवड बरोबर तिनं लग्न केलं. दोघांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. रिसेप्शनला दोघांची नंदीवरून वरात काढण्यात आली जी चर्चेत आली आणि त्यावरून प्राजक्ताला ट्रोल करण्यात आलं होतं. लग्नानंतर प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांचा ब्रेक घेतला होता. त्यानंतर ती पुन्हा कामाला लागली असून लग्नानंतरच पहिलं प्रोजेक्ट ती शूट करत होती. मात्र त्यावेळी तिच्या हेअर स्टाइलवरून तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
एक एक बाल पे काम...! नेटकऱ्यांनी केलं इतकं ट्रोल की प्राजक्ता गायकवाडवर आली हेअरस्टाईल लपवण्याची वेळ? VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल