TRENDING:

"अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार", फुलवंती देणार का प्राजक्ता माळीला नवी ओळख? TEASER

Last Updated:

prajakta mali Phullwanti Teaser : 'फुलवंती' सिनेमाचा एक मिनिट सात सेकंदाचा टीझर सर्वांचं लक्ष वेधत आहे. दमदार डायलॉग आणि नृत्याविष्कार टीझरमध्ये पाहायला मिळतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी मागील काही दिवसांपासून तिच्या 'फुलवंती' या सिनेमामुळे चर्चेत आहे. प्राजक्ता माळी या सिनेमाच्या निमित्तानं निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. ती सिनेमाची मुख्य नायिका आहे. 'फुलवंती' सिनेमातील तिचा पहिला लुक काही दिवसांआधी रिलीज झाला होता. त्यानंतर सिनेमाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्राजक्ता माळी
प्राजक्ता माळी
advertisement

'फुलवंती' सिनेमाचा एक मिनिट सात सेकंदाचा टीझर सर्वांचं लक्ष वेधत आहे. दमदार डायलॉग आणि नृत्याविष्कार टीझरमध्ये पाहायला मिळतोय. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या आतापर्यंतच्या सिनेमांमध्ये तिचा हा सिनेमा वेगळा आणि खास ठरताना दिसत आहे. सिनेमाच्या टीझरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बिग बॉस मराठीत मोठा ट्विस्ट! या आठवड्यात 'भाऊचा धक्का' नाही, होणार वेगळाच 'कार्यक्रम'

advertisement

( बिग बॉस मराठीत मोठा ट्विस्ट! या आठवड्यात 'भाऊचा धक्का' नाही, होणार वेगळाच 'कार्यक्रम' )

टीझरमध्ये तगडे डायलॉग ऐकायला मिळत आहेत. "अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार", "कंबरला नुसता झटका दिला तरी घरातला कुंकवाचा करंडा थरथरतो म्हणतात", "नाचात काहींना शौक दिसतो तर काहींना कला, प्रश्न नजरेचा आहे ती साफ असल तर फुलवंती पण तुम्हाला दुर्गाच दिसेल". या टीझरमधील या दमदार डायलॉगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

advertisement

'फुलवंती' हा सिनेमा पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृतीवर आधारित आहे. 11 ऑक्टोबरला सिनेमा रिलीज होणार आहे.

पेशवाई काळातील 'फुलवंती' नावाची सुप्रसिद्ध नर्तिका आणि प्रकांडपंडीत व्यंकटशास्त्री यांची दमदार कथा सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे देखण्या कलाविष्काराने सजलेली 'फुलवंती' मराठी सिनेसृष्टीतील भव्यदिव्य, अविस्मरणीय कलाकृती ठरणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनला भाव वाढ नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला आज दर? Video
सर्व पहा

'रेशमीगाठी' या मालिकेतून प्राजक्तानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर तिनं काही सिनेमात काम केलं. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून देखील प्राजक्ताला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. पण अभिनेत्री म्हणून प्राजक्ताला फार कमी फेम मिळाल्याचं पाहायला मिळतंय. 'फुलवंती' हा सिनेमा तिच्या करिअरला नवी दिशा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या/मनोरंजन/
"अख्खा हिंदुस्तान गाजवला, आता पुण्याला नादवणार", फुलवंती देणार का प्राजक्ता माळीला नवी ओळख? TEASER
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल