'फुलवंती' टायटल साँग, 'मदनमंजिरी' ही अस्सल लावणी आणि 'भो शंभो' अशी तीन गाणी प्राजक्तावर चित्रित करण्यात आली आहेत. तिन्ही गाण्यांमध्ये प्राजक्ताने जीव ओतून काम केलं आहे. एका गाण्यासाठी तब्बल सहा सहा दिवस प्राजक्तानं सलग शूट केलंय. सलग सहा दिवस ती आणि तिच्या नाचातील सगळ्यांची टीम त्याच एनर्जीने नाचली आहे. प्राजक्ताने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात तिने याचा खुलासा केलाय.
advertisement
( Gautami Patil Video: गौतमी पाटीलने केलंय मार्केट जाम, मराठी सिनेमाच्या प्रिमिअरला अशी पोहोचली की... )
'फुलवती' सिनेमाच्या सेटवर आतापर्यंत तुला मिळालेली सर्वोत्तम कॉम्प्लिमेंट कोणती असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला. त्याचं उत्तर देत प्राजक्ता म्हणाली, ''मला सगळ्यात बेस्ट कॉम्प्लिमेंट ही प्रवीण तरडे सरांकडून मिळाली. आम्ही बॅक टू बॅक डान्स सीक्वेन्स शूट करत होतो. सलग 6 दिवस डान्स शूट करत होतो. चोथ्या-पाचव्या दिवशी ते मला म्हणाले की हे दैवी आहे जे तू नाचतेस. हे शक्य नाहीये. इतके सलग डान्स सिक्वेन्सेस शूट करताना इतकी एनर्जी मेन्टेन करणं. हे गॉड गिफ्टेड आहे''.
प्राजक्ता पुढे म्हणाली, ''आतापर्यंत मी केलेलं माझं सर्वात आवडतं पात्र हे फुलवंती आहे. हा माझा ड्रीम रोल आहे. हे एका नर्तिकेचं पात्र आहे आणि मी स्वतः नर्तिका आहे. अभिनेत्री म्हणून यात खूप काही करण्यासारखं आहे. हा माझा ड्रीम रोल आहे''.