Gautami Patil Video: गौतमी पाटीलने केलंय मार्केट जाम, मराठी सिनेमाच्या प्रिमिअरला अशी पोहोचली की...

Last Updated:

मराठी सिनेमा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ 18 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात दाखल झाला. त्यामुळे सध्या हा सिनेमा आणि सिनेमाची कास्ट चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या एका प्रिमिअरला या सिनेमाची कास्ट एकत्र पाहायला मिळाली.

गौतमी पाटीलने केलंय मार्केट जाम
गौतमी पाटीलने केलंय मार्केट जाम
मुंबई : मराठी सिनेमा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ 18 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात दाखल झाला. त्यामुळे सध्या हा सिनेमा आणि सिनेमाची कास्ट चर्चेत आहेत. नुकत्याच झालेल्या एका प्रिमिअरला या सिनेमाची कास्ट एकत्र पाहायला मिळाली. सगळ्यांनीच आपल्या खास अंदाजात प्रिमिअरला हजेरी लावली. मात्र या सगळ्यांमध्ये हायलाईट झाली ती म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटील. यामागे कारणही तसंच होतं.
‘लाईक आणि सबस्क्राईब’ प्रिमिअरवेळी संपूर्ण टीम अगदी हटके आणि ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळाली. अमृता खानविलकर, अमेय वाघ, जुई भागवत असे अनेक कलाकार उपस्थित होते. सोबतच गौतमी पाटीलही होतीच. मात्र या प्रिमिअरवेळी गौतमी पाटील नो-मेकअप लूकमध्ये पाहायला मिळाली. ती अगदी सिंपल लूकमध्ये आली होती. गौतमीचा हा साधा अंदाजही तिच्या चाहत्यांना घायाळ करणारा होता.
advertisement
गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रिमिअरवेळीच्या काही खास क्षणांचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये गौतमी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. तिनं मेकअप केला नव्हता, कुठलाही ग्लॅमरस अंदाज तिचा नव्हता मात्र तरीही गौतमीने लाइमलाईट खेचली. व्हिडिओ व्हायरल होत असून चाहते तिच्या या साध्या अंदाजाचं कौतुक करत आहेत.
advertisement
गौतमीच्या या विनामेकअप लूकपुढे ग्लॅमरस अमृता खानविलकरही फिकी पडली. चाहते कमेंट करून म्हणत आहेत, "पब्लिक क्वीन", "सिंप्लिसीटी", "सबसे कातिल गौतमी पाटील", "सेलिब्रिटी गौतमी".
advertisement
दरम्यान, ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या सिनेमात गौतमी पाटील पहिल्यांदाच आयटम सॉंग करताना दिसणार आहे. ‘लिंबू फिरवंल’ या गाण्यात गौतमी झळकली असून तिचा हा नवा अंदाजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Gautami Patil Video: गौतमी पाटीलने केलंय मार्केट जाम, मराठी सिनेमाच्या प्रिमिअरला अशी पोहोचली की...
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement