प्रियाच्या जाण्याने मराठी इंडस्ट्री शोकसागरात बुडाली आहे. चाहत्यांसोबतच तिचे सहकलाकार, मित्रमंडळींनाही धक्का बसला आहे. ABP ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणाली, “प्रिया ही शांत, सोज्वळ, गुणी मुलगी होती. तिचं कामावर खूप प्रेम होतं. ती कधीच कुणाला दुखावत नसे. देव अशी चांगली माणसं का नेतो, असा प्रश्न मनात येतोय.”
'कॅन्सरने तिची पाठ सोडली नाही..' सुबोध भावेंची बहिण प्रिया मराठेसाठी इमोशनल पोस्ट
advertisement
प्रियाने आणि प्राजक्ताने सोबत काम केलं होतं. दोघींनी 'एकापेक्षा एक' आणि अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केले होते. त्यामुळे प्रियाच्या निधनाची बातमी प्राजक्ताच्या मनाला चटका लावून गेली.
प्रियाने करिअरची सुरुवात मराठी रंगभूमीतून केली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं. ‘या सुखांनो या’, ‘तू तिथे मी’, ‘चार दिवस सासूचे’ अशा मालिकांमधून ती घराघरात पोहोचली. हिंदीतही तिने आपली ओळख निर्माण केली. ‘पवित्र रिश्ता’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते हैं’, ‘साथ निभाना साथिया’ अशा मालिकांमध्ये तिच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून प्रिया कॅन्सरशी झुंज देत होती मात्र ही झुंज अपयशी ठरली.
