सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा-द राइज' या ब्लॉकबस्टर पॅन-इंडिया अॅक्शन ड्रामामध्ये अल्लू अर्जुनचा मित्र 'केशव' या भूमिकेसाठी लोकप्रिय आहे. चित्रपटातील मुख्य अभिनेत्यासोबतच 'केशव'च्या व्यक्तिरेखेलाही लोकांनी भरभरून प्रेम दिले. पण 'केशव' म्हणजेच अभिनेता जगदीश प्रताप बंदरी याच्या चाहत्यांना धक्काच बसला जेव्हा एका ज्युनियर महिला कलाकाराच्या मृत्यूनंतर त्याचे नाव या प्रकरणात पुढे आले. आता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
advertisement
काय होते प्रकरण
ही बाब 29 नोव्हेंबरची आहे. वास्तविक, एका ज्युनियर आर्टिस्टने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर तिच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपास केला असता, जगदीशने खासगी फोटोंच्या मदतीने मुलीला ब्लॅकमेल केल्याचे निष्पन्न झाले, त्यामुळे तिने आत्महत्या केली. जगदीशने गुपचूप महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत फोटो काढले होते. या प्रकरणाच्या तपासानंतर जगदीशला पुंजागुट्टा पोलिसांनी ताब्यात घेतले आणि न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
कबुल केलेला गुन्हा
TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, चौकशीनंतर जगदीशने आता आपला गुन्हा कबूल केला असून त्याने चुकीच्या हेतूने महिलेचे फोटो काढल्याचे कबूल केले आहे. या अभिनेत्याने कबुली दिली आहे की, त्याने आपल्या ज्युनियर महिला कलाकाराला हे फोटो लोकांसमोर आणण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले होते.
ते एकतर्फी प्रेम होते!
जगदीशने पोलिसांना सांगितले की, तो तिला एकतर्फी पसंत करतो. पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देताना त्याने मुलीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होते आणि त्याला पाहून त्याचा हेवा वाटू लागल्याचेही सांगितले. जगदीश त्या मुलीला पाच वर्षांपासून ओळखत होता.