TRENDING:

Rashmika Mandanna: लग्नानंतर महिनाभरातच रश्मिकाने शेअर केली गुडन्यूज, म्हणाली '18 मार्चला...'

Last Updated:

Cocktail 2 First Look: 'कॉकटेल'नंतर आता तब्बल १४ वर्षांनंतर त्याच नावाचा, आणि तितकाच फ्रेश वाटणारा 'कॉकटेल २' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात लग्नगाठ बांधल्यानंतर आता रश्मिका पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी उत्सुक झाली आहे. नुकतंच रश्मिकाने तिचा आगामी बॉलिवूड चित्रपट कॉकटेल 2 लूकचा फर्स्ट लूक रिव्हिल केला असून नव्या अवतारात रश्मिकाला पाहून चाहते खूप खूश झाले आहेत. २०१२ मध्ये सैफ अली खान, दीपिका पदुकोण आणि डायना पेंटी यांच्या लव्ह ट्रायंगलने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. आता तब्बल १४ वर्षांनंतर त्याच नावाचा, आणि तितकाच फ्रेश वाटणारा 'कॉकटेल २' प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
News18
News18
advertisement

कॉकटेल २ ची स्टारकास्ट आणखीनच ग्लॅमरस असून, शुक्रवारी सोशल मीडियावर या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. मात्र, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये एक मोठी उत्सुकता आणि सस्पेन्स निर्माण केला आहे. नुकत्याच समोर आलेल्या पोस्टरमध्ये शाहीद कपूर, क्रिती सेनॉन आणि रश्मिका मंदाना हे त्रिकूट एका स्टायलिश कारमध्ये बसून समुद्रकिनाऱ्यावर सुट्ट्यांचा आनंद घ्यायला जाताना दिसत आहे. तिघांच्याही चेहऱ्यावरचा बिंदास अंदाज पाहून हा चित्रपट पुन्हा एकदा फ्रेंडशीप आणि प्रेमाची रंजक सफर घडवून आणणार, याची खात्री वाटतेय. रश्मिकाने हे पोस्टर शेअर करताना लिहिलंय, "अधिक माहितीसाठी १८ मार्चला थिएटरमध्ये जा!"

advertisement

थिएटरमध्ये जाण्याआधी पोट भरूनच जा, पहिल्या भागापेक्षाही मोठा आहे Dhurandhar 2, मोठा धमाका करायला 'हमजा' तयार!

'धुरंधर २' सोबत खास कनेक्शन

'कॉकटेल २' चा सविस्तर फर्स्ट लुक किंवा टीझर पाहण्यासाठी प्रेक्षकांना १८ मार्चची वाट पाहावी लागेल. विशेष म्हणजे, हा टीझर ऑनलाईन नाही, तर फक्त थिएटरमध्येच पाहता येणार आहे. १८ मार्चला संध्याकाळी ५ वाजल्यापासून देशभरातील ५० हजार स्क्रीन्सवर 'धुरंधर: द रिव्हेंज' चे पेड प्रिव्ह्यू शोज सुरू होत आहेत. याच 'धुरंधर २' च्या शोसोबत 'कॉकटेल २' चा फर्स्ट लुक धमाका मोठ्या पडद्यावर दाखवला जाणार आहे. मॅडॉक फिल्म्सची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

advertisement

लग्नानंतर रश्मिकाची पहिली मोठी घोषणा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

काही दिवसांपूर्वीच उदयपूरमध्ये विजय देवरकोंडा सोबत विवाहबंधनात अडकलेली रश्मिका सध्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आघाड्यांवर सुखात आहे. ४ मार्चला हैदराबादमध्ये झालेल्या तिच्या रिसेप्शनला दिग्दर्शक होमी अदाजानिया, क्रिती सेनॉन आणि निर्माता दिनेश विजन यांनी हजेरी लावली होती. या मैत्रीचं प्रतिबिंब आता 'कॉकटेल २' मध्ये पाहायला मिळणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनोरंजन/
Rashmika Mandanna: लग्नानंतर महिनाभरातच रश्मिकाने शेअर केली गुडन्यूज, म्हणाली '18 मार्चला...'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल