TRENDING:

मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा! शाही लग्नसोहळ्याच्या फोटोंनंतर रश्मिका-विजयचा पहिला VIDEO

Last Updated:

Rashmika Mandanna Vijay Deverakonda : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अशात आता त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं. त्यांच्या लग्नाच्या फोटोंची प्रतीक्षा अनेकांना होती. त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले आणि ते तुफान व्हायरल झाले. त्यानंतर आता पहिल्यांदाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा पहिल्यांदाच मीडियासमोर आले आहेत.
News18
News18
advertisement

26 फेब्रुवारी 2026 रोजी रश्मिका आणि विजय यांनी उदयपूरमध्ये शाही विवाहसोहळा पार पडला. त्यांनी तेलुगू आणि कोडवा अशा दोन पद्धतीनं लग्न कोलं. दोघांनी पारंपरिक पद्धतीचे कपडे घातले होते.  दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. अशात आता त्यांचा व्हिडीओही समोर आला आहे. लग्नानंतर ते पहिल्यांदाच एकत्र दिसले आहेत.

Rashmika Vijay : लग्नाआधीच ठरलं होतं! लग्नानंतर एकत्र दिसणार नाहीत रश्मिका-विजय?

advertisement

रश्मिकाने लाल रंगाचा तर विजयने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसतो आहे. आतापर्यंत लग्नाच्या चर्चा सुरू असताना मीडियापासून दूर दूरच राहणाऱ्या किंवा पळ काढणारे रश्मिका आणि विजय नवरा-बायको म्हणून अगदी अभिमानाने त्यांच्या समोर गेले. सगळ्यांसमोर हात जोडून, मान झुकवून आनंदाने नमस्कार केला. सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद स्वीकारले. एकमेकांना मिठी मारून फ्लाइंग किस देत सगळ्यांचे आभार मानले.

advertisement

लग्नानंतर रश्मिका आणि विजयची पोस्ट

लग्नानंतर विरोशनी पोस्ट करत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. विजयच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

विजयने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, "एक दिवस मला तिची खूप आठवण आली... अशी आठवण की ती माझ्यासोबत असती तर माझा दिवस अजून सुंदर झाला असता असं वाटलं. ती समोर बसून जेवत असती तर जेवणही अधिक समाधानकारक वाटलं असतं. ती सोबत असती तर माझे वर्कआउट्स शिक्षा वाटण्याऐवजी मजेशीर झाले असते. मी कुठेही असलो तरी घरासारखी शांतता आणि आपलेपणाची भावना देण्यासाठी तिचीच गरज होती, असं मनापासून वाटलं. म्हणून मी माझ्या जिवलग मैत्रिणीलाच माझी पत्नी बनवलं. 26.02.2026."

advertisement

'विरोश'नंतर आणखी एक सेलिब्रिटी अडकणार लग्नाच्या बेडीत; रश्मिका-विजयच्या लग्नावेळीच जाहीर केली तारीख

तर रश्मिकाने लग्नाचे फोटो शेअर करत, "नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो. इंट्रोड्यूस करते माझा नवरा मिस्टर विजय देवरकोंडा", असं म्हणत पोस्टला सुरुवात केली.

यानंतर रश्मिकाने लिहिलं, "हा माणूस ज्याने मला खरं प्रेम काय आहे हे शिकवलं. ज्याने मला दाखवलं की शांत असणं कसं असतं. ज्याने मला सांगितलं की दररोज स्वप्न पाहणं ठीक आहे आणि ज्याने मला नेहमीच सांगितलं की मी जे काही विचार करू शकतो ते मी साध्य करू शकते. ज्या माणसाने मला नाचण्यापासून कधीही रोखले नाही, ज्याने मला मित्रांसोबत फिरण्यास सांगितले आणि माझ्यावर विश्वास ठेवा, मी या माणसावर एक पुस्तक लिहू शकते"

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
ओला कचरा, सुका कचरा...., तुमचीही सकाळ याच गाण्याने सुरू होते? मग कुणी लिहिलंय?
सर्व पहा

मी खरोखर भाग्यवान आहे. विज्जू तुझ्याबद्दलच्या माझ्या भावनांचे वर्णन करताना नेहमीच शब्द कमी पडतात", असं ती म्हणाली.

मराठी बातम्या/मनोरंजन/
मिस्टर आणि मिसेस देवरकोंडा! शाही लग्नसोहळ्याच्या फोटोंनंतर रश्मिका-विजयचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल